पाटील पिता-पुत्र खून खटल्यात कोर्टाचा निकाल, माजी नगराध्यक्ष पवारसह 11 जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

Dhule Patil Father Son Murder Case Court Verdict: धुळे शहरातील देवपूर येथे 2018 मध्ये झालेल्या पाटील पिता-पुत्रांच्या दुहेरी खून प्रकरणी धुळे सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.
Dhule Sessions Court sentences 11 accused including former mayor Bajirao Pawar to double life imprisonment in the 2018 Patil father-son murder case.
Dhule Sessions Court sentences 11 accused including former mayor Bajirao Pawar to double life imprisonment in the 2018 Patil father-son murder case.Saam Tv
Published On

भूषण अहिरे, साम टीव्ही

धुळे शहरातील देवपूरमध्ये गोंदर रोडवर सात वर्षांपूर्वी घडलेल्या पिता-पुत्रांच्या दुहेरी खून प्रकरणात सत्र न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांनी माजी नगराध्यक्ष यांच्यासह 12 जणांना दोषी ठरवले असून एका आरोपीला निर्दोष मुक्त केले आहे. दोषी ठरलेल्या आरोपीना आज धुळे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

Dhule Patil father son murder case court verdict
Dhule Patil father son murder case court verdictSaam Tv

देवपुरातील रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील या पिता-पुत्राच्या खुन खटल्यात माजी नगराध्यक्ष बाजीराव पवारसह 11 जणांना धुळे न्यायालयाने दोषी ठरवले आहे. धुळ्यातील देवपुरात 8 जून 2018 रोजी रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील या पित्रा पुत्राची जमावाने निघृण हत्या केली होती. याचा निकाल आज धुळे न्यायालयाने दिला असून, तब्बल आठ वर्षानंतर न्यायालयाने दोशींना शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालावर समाधान व्यक्त करत मृत रावसाहेब पाटील यांचे बंधू प्रशांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेल्या एक जण आणि फक्त पाच वर्षांची शिक्षा दिलेल्या आणखी एका आरोपी विरोधात माननीय उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याची भूमिका प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Dhule Sessions Court sentences 11 accused including former mayor Bajirao Pawar to double life imprisonment in the 2018 Patil father-son murder case.
'मारू नका नं...! बायको रडत विनवण्या करत होती,पण...; ऊसतोड मजुराला बागायतदाराकडून काठीने बेदम मारहाण|Video Viral

या निकालाकडे संपूर्ण जिल्हाभराचे लक्ष लागून राहिले होते कारण अर्जुन 2018 रोजी झालेल्या या पिता पुत्राच्या निर्गुण हत्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरला होता, आज धुळे न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे न्यायव्यवस्था जिवंत असून आपल्याला न्यायव्यवस्थेवरती विश्वास होता, आणि पोलीस प्रशासनाने देखील बजावलेल्या भूमिकेमुळे दोषींना शिक्षा सुनावण्यास मदत झाली असल्याची भावना प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

नेमके प्रकरण काय?

8 जून रोजी पूर्व वैमनस्यातून रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा यांची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार याच्यासह भूपेश वाल्मीक पाटील, हर्षद उर्फ दादू रवींद्र पाटील, जयराज शामकांत पाटील, ऋषिकेश शामकांत पाटील, दर्शन अंबादास परदेशी, भगवान नानाभाऊ आहीरे, संदीप उर्फ विक्की दिलीप वेळीस, अप्पा उर्फ अर्जुन भगवान अहिरे, गौरव बाजीराव पवार, भूषण बाबुराव कापकर आणि भूषण निंबा पगारे यांच्याविरोधात खून, पुरावे नष्ट करणे तसेच आरोपींना मदत करणे हे गुन्हे दाखल केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com