'मारू नका नं...! बायको रडत विनवण्या करत होती,पण...; ऊसतोड मजुराला बागायतदाराकडून काठीने बेदम मारहाण|Video Viral
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात ऊसतोड मजुराला मारहाण.
बागायतदाराकडून लाथा-बुक्की आणि काठीने बेदम मारहाण.
पत्नी समोरच मारहाण; "मारू नका" अशी विनवणी व्हिडिओत दिसली.
योगेश काशिद, साम प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील गुंडगिरी, भाईगिरीचे प्रकरणं कमी होताना दिसत नाहीयेत. संतोष देशमुख, ज्ञानेश्वर मुंढे प्रकरणानंतर बीड जिल्ह्याचं नाव गु्न्हेगारीमुळे अख्खा महाराष्ट्रात चर्चेला आले. येथील काय गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचं चित्र येथे तयार झाले आहे. धारूर तालुक्यातील एक व्हिडिओ व्हायरल झालाय, त्यात एका ऊसतोड मजुराला बागायतदारांकडून मारहाण करण्यात आली आहे. धारूर तालुक्यातील खारेवाडी शिवारात ही मारहाणीची घटना घडली आहे.
ऊसाच्या वाढ्यात कांडी का ठेवतो. तुला ऊस नीट तोडता येत नाही, असं म्हणत एका ऊसतोड मजुराला बागायतदाराने लाथा- बुक्की आणि काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. गणेश बाळासाहेब वाघ अस ऊसतोड मजुराचे नाव आहे. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. यात ऊसतोड मजुराची पत्नी "मारू नका नं, असं रडत रडत विनवणी करत होती.
पण गुंडगिरी करणारे बागायतदारांना तिच्यावर दया आली नाही. तिच्यासमोरच तिच्या नवऱ्याला लाथाबुक्यानं मारत होते. दरम्यान व्हायरल झालेल्या ऊसतोड मजुराच्या मानेवर पाय दिल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान ऊसतोड मजूर कुटुंब दहशतीखाली आहे.पत्नी आणि भाऊ वाचवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे..
दरम्यान या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गब्बू खाडे, श्रीकांत खाडे, अजय वसंत खाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेल्या ऊसतोड मजुरावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील खारेवाडी शिवारात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

