

पुण्यातील कॅम्प परिसरात तरुणाची निर्घृण हत्या.
फैसल फारुख खान असे मृत तरुणाचे नाव.
किरकोळ वाद आणि थट्टा-मस्करीतून हल्ला झाल्याची माहिती.
पुणे शहरातील गुन्हेगारी थांबताना दिसत नाहीये. शुल्लक कारणावरून शहरात हत्येच्या घटना घडू लागल्या आहेत. पुण्यातील कॅम्प परिसरात अशीच हत्येची घटना घडली आहे. थट्टा-मस्करीतून एका तरुणाची हत्या झाली आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात एका तरुणाची त्याच्याच मित्रांनी धारदार शस्त्राने वार करत त्याची निर्घृण हत्या केली. फैसल फारुख खान असे मृत तरुणाचे नाव आहे. या हत्येच्या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मयत फैसल खान आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र होते. काल दोघांमध्ये कॅम्प परिसरात किरकोळ वाद झाला. त्यानंतर सहा जणांनी फैसलवर चाकूने वार केला. आरोपी शहबाज शेख याची फैसलनं मस्करी केली. त्याचा राग आल्याने शहबाज याने फैसलच्या कानाखाली चापट मारली. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर शहबाज शेख व त्याच्या बाकीदारांनी धारदार चाकूने फैसल खानच्या छातीत, पाठीत, हातावर, आणि डोक्यात वार केले. यात फैसलचा मृत्यू झाला.
दरम्यान आरोपींनी पूर्ववैमनस्यातून फैसलला गाठत त्याच्यावर चाकू हल्ला केला. फैसलच्या छातीत, पाठीत, हातावर आणि डोक्यात गंभीर जखमा झाल्याने तो रक्तबंबाळ झाला. दरम्यान स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी बजाद अली सय्यद, अली अब्बास अश्रफअली सय्यद, सोहेल युसुफ तांबोली आणि शाहबाज चांद शेख या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर तालिब अली सय्यद आणि अश्रफली सय्यद यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.