Beed News : धक्कादायक! सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर आक्रित घडलं, धावत्या कारने घेतला पेट

Solapur Dhule highway accident : बीडच्या मांजरसुंबा घाटात सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारने अचानक पेट घेतला. प्रवासी थोडक्यात बचावले असून कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

Moving car catches fire on Solapur Dhule National Highway : बीडच्या मांजरसुंबा घाटात राष्ट्रीय महामार्गवरती एका कारने पेट घेतला..यातून प्रवासी थोडक्यात बचावलेत...मात्र या आगीत कार जळून खाक झालीय.. कारला नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे...

बीडच्या मांजरसुंबा घाटात राष्ट्रीय महामार्ग वरती धावत्या वाहनाला भीषण आग लागली. या कारने मोठा पेट घेतला असून जाळाचे लोट पाहायला मिळाले. बीड लगत असलेल्या मांजरसुंबा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती प्रवाशाच्या कारला आग लागली होती.

आगीमुळे गाडी जळून खाक झाली. आग लागण्याचे नेमकं कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे. दिलासादायक म्हणजे, या दुर्घटनेतून प्रवासी थोडक्यात बचावले. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कारला नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापपर्यंत समोर आले नाही. स्थानिक पोलीस ग्रामीणने घटनास्थळी धाव घेतली, असून घटनेची चौकशी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com