Sidhu Moosewala: सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात मोठी अपडेट, गोल्डी ब्रारसह 25 जणांवर आरोप निश्चित

Sidhu Moosewala Case: आरोपी गोल्डी ब्रार (goldy brar) , लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi), जग्गू भगवानपुरिया, चरणजीत चेतन आणि जगतार सिंह यांनी दाखल केलेली निर्दोषत्वाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
Siddhu Moose Wala
Siddhu Moose Wala Saam Tv
Published On

पंजाबचा प्रसिद्ध गायक शुभदीप सिंग सिद्धू अर्थात सिद्धू मुसेवाला (Shidhu Moosewala) हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मानसा जिल्हा न्यायालयाने बुधवारी लॉरेन्स बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरिया यांच्यासह २५ जणांवर आरोप निश्चित केले. याशिवाय आरोपी गोल्डी ब्रार (goldy brar) , लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi), जग्गू भगवानपुरिया, चरणजीत चेतन आणि जगतार सिंह यांनी दाखल केलेली निर्दोषत्वाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया, चरणजीत चेतन आणि जगतार सिंह यांनी सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाशी आमचा कोणताही संबंध नसल्याचा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. पण न्यायालयाने त्यांनी दाखल केलेला अर्ज फेटाळून लावला आहे. या प्रकरणात आरोप निश्चित झाल्यानंतर सिद्धू मुसेवाला याच्या वडिलांनी न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना बलकौर सिंह यांनी सांगितले की, 'न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता या प्रकरणात न्याय मिळण्याची आशा वाटत आहे. '

Siddhu Moose Wala
Delhi School Bomb Threat: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी प्रकरण, दिल्ली सरकारने शिक्षकांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

'मूसेवाला हत्याकांडात अनेक व्हाईट कॉलर कट रचणारे आहेत. मात्र त्यांना अद्याप तपासात समाविष्ट करण्यात आलेले नाही.', असे देखील त्यांनी सांगितले. बलकौर सिंह पुढे म्हणाले की, 'केंद्र आणि पंजाब सरकारने या प्रकरणी त्यांचा आतापर्यंत छळ केला आहे. तुरुंगातून सुटलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या व्हिडिओचीही अद्याप चौकशी झालेली नाही. पंजाबच्या तुरुंगात बसून लॉरेन्स आणि त्याच्या गुंड साथीदारांनी उघडपणे हा कट रचला आणि अनेक पोलिस अधिकारी परदेशातही गेले. ज्यांचा तपासात समावेश नव्हता.', असा आरोप केला आहे.

Siddhu Moose Wala
Prajwal Revanna : सत्य लवकरच समोर येईल; कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणावार प्रज्वल रेवन्नांनी सोडलं मौन

ते पुढे म्हणाले की, लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात बसून वार्षिक 5 कोटी रुपयांपर्यंत कमाई करत असल्याचे एनआयएच्या तपासातून समोर आले आहे आणि आताही विविध प्रकारच्या हत्यांची जबाबदारी गुंडांकडून घेतली जात आहे.' सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील दोषी ठरवल्यानंतर मानसा न्यायालयाने पुढची सुनावणी २० मे रोजी ठेवली आहे. गोल्डी ब्रारच्या मृत्यूबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

दरम्यान, सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात सर्व 27 आरोपींना कलम 120B अंतर्गत नाव देण्यात आले आहे. कलम 302, 307 आणि 326 अंतर्गत या प्रकरणातील शूटर्सची नावे आहेत. लॉरेन्स बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया आणि इतरांचा शस्त्रास्त्र कायद्यात समावेश करण्यात आला आहे. लॉरेन्स आणि जग्गू भगवानपुरिया यांची नावे 52 तुरुंग कायद्यात आहेत.

Siddhu Moose Wala
PM Modi Speech: 'चहा विक्रेत्याने देशाची अर्थव्यवस्था ११ वरून ५व्या क्रमांकावर आणली'; पीएम मोदींनी गुजरातमध्ये काय सांगितलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com