Prajwal Revanna : सत्य लवकरच समोर येईल; कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणावार प्रज्वल रेवन्नांनी सोडलं मौन
Prajwal Revanna scandal: Saamtv

Prajwal Revanna : सत्य लवकरच समोर येईल; कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणावार प्रज्वल रेवन्नांनी सोडलं मौन

Prajwal Revanna on allegation : कथित कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणी खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी मौन सोडलं आहे. या प्रकरणाचं सत्य लवकरच समोर येईल, अशी प्रतिक्रिया जेडीएस पक्षाचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी दिली.

नवी दिल्ली : कथित कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणी खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी मौन सोडलं आहे. या प्रकरणाचं सत्य लवकरच समोर येईल, अशी प्रतिक्रिया जेडीएस पक्षाचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी दिली. तसेच या व्हिडिओमध्ये इतरांनी बदल केल्याचं सांगत आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणी प्रज्वल यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचाही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हासनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं की, 'मी बेंगळुरुमध्ये नाही. वकिलांच्या माध्यमातून तपास पथकाशी संपर्क साधला आहे. या चौकशीदरम्यान मी बेंगळुरूमध्ये नाही. मी माझ्या वकिलाच्या माध्यमातून साआयडी बेंगळुरुला सूचना दिली आहे. या प्रकरणाचं सत्य लवकरच समोर येईल'.

दरम्यान, रेवन्ना यांनी एसआयटीच्या नोटीसला वकिलाच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. त्यांनी भारतात परतण्यासाठी आण तपास पथकासमोर हजर राहण्यासाठी सात दिवसांता वेळ मागितला आहे.

Prajwal Revanna : सत्य लवकरच समोर येईल; कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणावार प्रज्वल रेवन्नांनी सोडलं मौन
PM Modi Speech: 'चहा विक्रेत्याने देशाची अर्थव्यवस्था ११ वरून ५व्या क्रमांकावर आणली'; पीएम मोदींनी गुजरातमध्ये काय सांगितलं?

'या प्रकरणात माझ्या कुटुंबीयांनी सांगितलं की, माझ्या कार्यालयात पाठवलेली नोटीस ही घरावर सीआरपीसी कलमानुसार चिटकवण्यात आली आहे'. प्रज्वल सध्या भारतात नाही. तसेच त्यांनी नोटीस याविषयी भाष्य केलं. त्यांनाचौकशीसाठी हजर राहण्यासाठी सात दिवस हवेत.

Prajwal Revanna : सत्य लवकरच समोर येईल; कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणावार प्रज्वल रेवन्नांनी सोडलं मौन
Heat Wave Alert: देशात उष्णतेचा स्फोट! या राज्यात 8 दिवस राहणार उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा

सिद्धरामय्या यांचा गंभीर आरोप

'कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रज्वल रेवन्ना यांनी भारत सोडला आहे. ते जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात आहेत, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला. तसेच यावेळी सिद्धरामय्या यांनी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्यावर नातवाला देशातून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप केला. कर्नाटक सरकारने या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे.

तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी या प्रकरणावर भाष्य केलं. काँग्रेसने आतापर्यंत प्रज्वल रेवन्ना यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रेवन्ना सध्या हासन लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com