PM Modi Speech: 'चहा विक्रेत्याने देशाची अर्थव्यवस्था ११ वरून ५व्या क्रमांकावर आणली'; पीएम मोदींनी गुजरातमध्ये काय सांगितलं?

PM Narendra Modi Criticized Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. 'चहा विक्रेत्याने देशाची अर्थव्यवस्था ११ वरून ५व्या क्रमांकावर आणली', असं वक्तव्य मोदींनी केलं आहे.
पंतप्रधान मोदी
PM ModiGoogle
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर (PM Modi In Gujrat) आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. गुजरात राज्यातील आनंदमध्ये प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी अनेक वर्षांपासून गुजरातमध्ये काम करत आहे. या निवडणुकीत आनंद आणि खेडा सर्व रेकॉर्ड मोडतील. तुम्ही मला २०१४ मध्ये देशाची सेवा करण्यासाठी पाठवलं होतं, असं मोदींनी म्हटलंय.

गुजरातमध्ये काम करताना गुजरातचा विकास हा भारताच्या विकासासाठी आहे, असा मंत्र आपला होता. आपण २०४७ ला स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करू, तोपर्यंत 'विकसित भारत' झाला पाहिजे, हेच माझं स्वप्न आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले (PM Modi Speech) आहेत.

आनंद येथे सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, 'एका चहा विक्रेत्याने देशाची अर्थव्यवस्था ११व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली आहे. काँग्रेस सरकार गरिबांच्या नावावर बँकांचे राष्ट्रीयीकरण करूनही गरिबांची बँक खाती उघडू शकले नव्हते. मोदींनी दहा वर्षात करोडो गरिबांची बँक खाती उघडली आहेत. भारतात काँग्रेस कमकुवत होत असल्याची टीका मोदींनी केली (PM Narendra Modi Criticized Congress) आहे.

काँग्रेसने साठ वर्षात काय केलं? असा सवाल मोदींनी विचारला आहे. बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. बँका ताब्यात घेतल्या. कॉंग्रेस फक्त २० टक्क्यांहून कमी घरांना नळाचं पाणी पुरवू शकलं. पण मागील दहा वर्षात देशातील ७५ टक्के घरांमध्ये नळाचं पाणी उपलब्ध झालं आहे, असं वक्तव्य त्यांनी गुजरातमध्ये केल्याची माहिती आजतकच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

पंतप्रधान मोदी
Special Report : Raj Thackeray आणि Narendra Modi एकाच मंचावर? शिवाजी पार्कात प्रचारसभा?

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, देशाने काँग्रेसची ६० वर्षे राजवट पाहिली आहे. तसंच भाजपचा दहा वर्षांचा सेवाकाळ देखील देशाने पाहिलाय. कॉंग्रेसचा शासनकाळ होता तर भाजपचा सेवा कालावधी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या साठ वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास जनतेकडे शौचालये नव्हती. साठ वर्षांनंतर भाजप सरकारने फक्त १० वर्षात १०० टक्के शौचालये बांधली आहेत, असं म्हणत त्यांनी कॉंग्रेसच्या कामावर ताशेरे ओढले आहेत.

पंतप्रधान मोदी
PM Modi: उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा; पंतप्रधान मोदींनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या मराठीतून शुभेच्छा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com