PM Modi: उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा; पंतप्रधान मोदींनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या मराठीतून शुभेच्छा

PM Narendra Modi Wishes Maharashtra Din: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या X अकाउंटवर पोस्ट करत मराठीमधून शुभेच्छा दिल्या आहेत.
PM Narendra Modi Wishes Maharashtra Din
PM Narendra Modi Wishes Maharashtra DinYandex

आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिनाची (Maharashtra Din) धामधून पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्याचा आज 65 वा स्थापना दिन साजरा होतोय. त्यामुळे सगळीकडे उल्हासाचं वातावरण आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा (PM Narendra Modi Wishes Maharashtra Din) दिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या X अकाउंटवर पोस्ट करत मराठीमधून शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

महाराष्ट्र दिन (Maharashtra Din Post)म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस आहे. ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले आहेत आणि हा दिवस या राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीशी संबंधित आहे. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आमच्या बांधिलकीचा आम्ही देखील पुनरुच्चार करत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा, अशा आशयाची पोस्ट त्यांनी (PM Narendra Modi) केली आहे.

पंतप्रधानांनी आज महाराष्ट्र दिनी राज्यातील सर्व जनतेला मराठीमधून पोस्ट करत शुभेच्छा (PM Modi News) दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेला आज ६५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आज संपूर्ण राज्यभरामध्ये उल्हासाचं वातावरण आहे. विशेष बाब म्हणजे पंतप्रधान मोदींनी या शुभेच्छा मराठीतून दिल्या (Modi Wishes Maharashtra Din) आहेत. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींनी काल राज्यात तीन ठिकाणी जाहीर सभा घेत भाषण केलं आहे.

PM Narendra Modi Wishes Maharashtra Din
PM Narendra Modi in Solapur : स्वत: बाबासाहेब आंबेडकर आरक्षण संपवू शकत नाहीत, मग मोदींचा प्रश्नच नाही; पंतप्रधानांनी ठणकावून सांगितलं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त X अकाउंटवरून पहिली पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या पोस्टमधून सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या (Maharashtra Din News) आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन असल्याचं म्हटलं आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे, महाराष्ट्र पुढे जात राहील हा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

PM Narendra Modi Wishes Maharashtra Din
Narendra Modi Exclusive : अभिजित पवार यांनी PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; देशभरासह महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com