Heat Wave Alert: देशात उष्णतेचा स्फोट! या राज्यात 8 दिवस राहणार उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा

Weather Department: हवामान खात्याने (Weather Department) देशातील 4 राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे वाढते तापमान लक्षात घेता नागरिकांना काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.
India Heat Wave
India Heat WaveYandex

देशातील अनेक राज्यामध्ये सध्या तापमान चांगलेच वाढले आहे. उन्हाचा पारा वाढत चालल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उकाड्यामध्ये अंगातून घामाच्या धारा लागल्या आहेत.अशामध्ये आता हवामान खात्याने (Weather Department) देशातील 4 राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे वाढते तापमान लक्षात घेता नागरिकांना काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

सध्या देशाच्या अनेक भागात प्रचंड उष्णतेने कहर केला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात मे महिन्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. दक्षिण राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, गुजरातमध्ये मे महिन्यात आणखी पाच ते आठ दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.

India Heat Wave
Uttar Pradesh News: अंघोळ करणाऱ्या महिलेला चोरून बघणारा जिवानीशी गेला; टेरेसवर तरूणासोबत घडलं भयंकर

पूर्व आणि ईशान्य भारतातील एप्रिलमधील सरासरी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस होते. हे तापमान १९०१ नंतरचे सर्वाधिक तापमान होते, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. या काळात वादळांची वारंवारता सरासरीपेक्षा कमी राहिली. त्यामुळे पूर्व आणि ईशान्य भारतातील तापमान तुलनेने जास्त होते. या भागातील नागरि उकाड्यामुळे वैतागले आहेत.

India Heat Wave
Delhi School Bomb Threat: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी प्रकरण, दिल्ली सरकारने शिक्षकांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

हवामान विभागाच्या मते, दक्षिण द्वीपकल्पीय भारतातील एप्रिलमधील सरासरी कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस हे १९०१ नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान होते. आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, दक्षिण द्वीपकल्पीय भारताचे तापमान १९८० पासून सामान्य तापमानापेक्षा जास्त आहे. ओडिशामध्ये २०१६ पासून या एप्रिलमध्ये सर्वाधिक उष्णतेची लाट आली.

दरम्यान, कर्नाटकमधील सहा जिल्ह्यांमध्ये उष्णेतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणीचे तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील बागलकोट, बेळगावी, धारवाड, गदग, हावेरी आणि कोप्पल या जिल्ह्यांमध्ये १ मे ते ९ मे दरम्यान तापमान ४० ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत राहिल, असे हवामान खात्याने सांगितले.d

India Heat Wave
PM Modi Speech: 'चहा विक्रेत्याने देशाची अर्थव्यवस्था ११ वरून ५व्या क्रमांकावर आणली'; पीएम मोदींनी गुजरातमध्ये काय सांगितलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com