Delhi School Bomb Threat: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी प्रकरण, दिल्ली सरकारने शिक्षकांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

Delhi Government Education Department Issued Advisory: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीच्या मेलनंतर दिल्ली सरकार अलर्ट मोडवर आलं आहे. याप्रकरणी आता दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागानं अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.
Delhi School Bomb Threat
Delhi School Bomb ThreatYandex

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीच्या मेलनंतर दिल्ली सरकार अलर्ट मोडवर आलं आहे. याप्रकरणी आता दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागानं अ‍ॅडव्हायजरी (Delhi Government Education Department) जारी केली आहे. शाळा व्यवस्थापन, व्यवस्थापक, सरकारी शाळांचे मुख्य अधिकारी यांनी ईमेल आयडी आणि मेसेज शाळा सुरू होण्यापूर्वी, शाळा सुरू असताना आणि नंतरही चेक करावेत, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा साहित्य दिसल्यास तात्काळ संबंधित जिल्हा शिक्षण अधिकारी आणि दिल्ली पोलिसांना त्याची माहिती द्यावी. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत, शाळा व्यवस्थापनाने कुटुंबातील सदस्य आणि संबंधित प्रकरणाची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन केलं आहे. द्वारकाचे डीपीएस, मयूर विहारचे मदर मेरी स्कूल आणि नवी दिल्लीच्या संस्कृती स्कूलसारख्या हायप्रोफाइल शाळांना धमकीचा मेल (Delhi School Bomb Threat) आला होता.

या सगळ्या प्रकरणी पोलिसांच्या विविध टीम तपासणी करत आहेत. शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल ( Bomb Threat) नेमका कुठून पाठवला आणि त्याच्यामागचा हेतू काय होता, याची चौकशी सुरू आहे. पालकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला आहे. हा मेल आल्यानंतर काही शाळांना सुट्टी देण्यात आली होती. परंतु हा मेल आल्यानंतर दिल्लीमध्ये मोठी घबराट पसरली आहे.

Delhi School Bomb Threat
Bomb Threat Mailed To Nagpur Airport: नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवणार, धमकीचा मेल; विमानतळावर मोठा गोंंधळ

दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून (Delhi News) देण्याच्या धमकीचा मेल १ मे रोजी प्राप्त झाला होता आहे. ८ ते ९ शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल एका अज्ञात व्यक्तीने पाठवला होता. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. याची माहिती पोलिसांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं.

Delhi School Bomb Threat
Bengluru Cafe Bomb Blast: बेंगळुरू बॉम्बस्फोटातील आरोपींवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर, एनआयएने फोटो केला प्रसिद्ध

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com