नागपूर विमानतळ बॉम्बने उडवणार असल्याचा धमकीचा मेल प्राप्त झाला आहे. त्यानंतर विमानतळावर मोठा गोंधळ उडाला होता. देशभरात आज अनेक विमानतळांवर धमकीचा मेल आला (Nagpur Airport Police Mock Dreal) आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अलर्ट मोडवर आली आहे. विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलीस सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करत आहेत.
काल अश्याच पद्धतीने मुंबई विमानतळाला धमकी देण्यात आली होती. धमकी मिळाल्यानंतर विमानतळाची तपासणी केली जात आहे. यात काही मिळून आल्यास रियल ड्रिल असेल. पण सध्या ड्रिलच्या माध्यमातून तपासणी केली जात (Police Mock Dreal) आहे. धमकीचे मेल आल्यानंतर त्याची तपासणी करणे, हा सुरक्षेच्या अनुषंगाने एक पाऊल आहे.
पण तपासणीत काही आढळून न आल्यास ती मॉक ड्रिल (Nagpur News) ठरते. तपासणीत अद्याप पर्यंत काहीही मिळून न आल्याने ही मॉक ड्रिल असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगितलं जातं आहे. विमानतळावर (Bomb Threat) कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडूनही आता कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. धमकीचा मेल आल्यानंतर लगेच पोलीस प्रशासन आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले (Bomb Threat To Airport) होते.
मुंबईमध्ये देखील असाच धक्कादायक प्रकार समोर (crime) आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबई विमानतळाच्या अधिकाऱ्यांना कॉल करून विमानतळावर बॉम्ब ठेवला असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर विमानतळ आणि अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांनी धमकी देणाऱ्या या अज्ञात व्यक्तीविरुद्ध (threat news) शुक्रवारी गुन्हा दाखल केला. धमकीच्या फोननंतर सर्व सुरक्षा यंत्रणा तातडीनैे सतर्क झाल्या होत्या. त्यानंतर लगेच पोलिसांनी विमानतळाची तपासणी केली (crime news) होती. परंतु पोलिसांना काहीच संशयास्पद आढळलं नव्हतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.