Bomb Threat: 'मुंबईत याल तर सगळे...' इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; प्रवासी, कर्मचाऱ्यांची धावपळ

Bomb Blast Threat: चेन्नईहून मुंबईकडे निघालेल्या इंडिगो फ्लाइट 6E-5188 या विमानात बॉम्ब असल्याचे पत्र विमान हवेत असताना मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली
Delhi Airport News
Delhi Airport NewsSaamtv
Published On

IndiGo Flight Bomb Threat:

चेन्नईहून मुंबईकडे निघालेल्या इंडिगो फ्लाइट 6E-5188 या विमानात धमकीचे पत्र विमान हवेत असताना मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या पत्रानंतर हे विमान तात्काळ थांबवण्यात आले, सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. मात्र तसा कोणताही प्रकार न आढळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चेन्नई येथून मंगळवारी सकाळी इंडिगो कंपनीच्या ६ई-५१८८ या विमानाने मुंबईसाठी उड्डाण केले होते. विमान मुंबईपासून ४० किलोमीटर अंतरावर असताना विमानाच्या शौचालयात कर्मचाऱ्यांना एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीमध्ये "मुंबईला याल तर सगळे मरतील," अशा आशयाचा मजकूर होता.

एका टिश्यू पेपरवर ही धमकी लिहण्यात आली होती.या धमकीमुळे प्रवासी, कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. हा प्रकार केबिन क्रूच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पायलटला याबाबत माहिती दिली. तसेच विमानाच्या कॅप्टनने तात्काळ एअर ट्राफिक कंट्रोलला याबाबतची माहिती दिली.

Delhi Airport News
Dhananjay Munde: पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार: कृषीमंत्री धनंजय मुंडे

दरम्यान, विमान मुंबईत उतरताच संपूर्ण विमानाची आणि प्रवाशांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत विमानात काहीही संशयास्पद न सापडल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला. ज्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Delhi Airport News
CM Eknath Shinde: नाहीतर तुमचीही सफाई करेन..., ५१५० इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पण सोहळ्यात CM शिदें अधिकाऱ्यांवर का भडकले?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com