Dhananjay Munde: पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार: कृषीमंत्री धनंजय मुंडे

Maharashtra Farmer News: आधार लिंक अथवा इतर कारणांमुळे पिक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर लावण्याची सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली.
Maharashtra Farmer News
Maharashtra Farmer NewsSaamtv

रुपाली बडवे, मुंबई|ता. १३ फेब्रुवारी २०२४

Maharashtra Farmer News:

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याकरिता अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम तसेच कृषी विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला चालू हंगामातील पिक विम्याचा आढावा घेण्यात आला. तसेच आधार लिंक अथवा इतर कारणांमुळे पिक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर लावण्याची सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. चालू वर्षी शासनाने पीक विम्यासाठी भरघोस तरतूद केली. सन 2016 नंतर सर्वात जास्त पीक विम्याचा लाभ चालू वर्षी शेतकऱ्यांना मिळवून दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Farmer News
CM Eknath Shinde: नाहीतर तुमचीही सफाई करेन..., ५१५० इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पण सोहळ्यात CM शिदें अधिकाऱ्यांवर का भडकले?

मात्र, याबाबत वारंवार लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून तक्रारी येत असल्याने पीक विम्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर कराव्यात किंवा काही राज्यांनी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार केला असून त्याची कार्यपद्धती, योजना व अंमलबजावणी यांचा अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठीत करावी, असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले.

दरम्यान, या समितीची कार्यकक्षा व रचना याबाबत वेगळ्या सूचना निर्गमित करण्याचे सुद्धा निर्देश यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. सदर समिती एक महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करेल. (Latest Marathi News)

Maharashtra Farmer News
Uddhav Thackeray: शेतकऱ्यांची गॅरंटी कोण घेणार? शेतकरी आंदोलनावरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com