CM Eknath Shinde: नाहीतर तुमचीही सफाई करेन..., ५१५० इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पण सोहळ्यात CM शिदें अधिकाऱ्यांवर का भडकले?

Electric Vehicle: स्पर्धात्मक युगात जगताना आपल्याला पर्यावरणाचा समतोलही राखायचा आहे. एसटी डेपोंची अवस्था पाहिली आहे. या सर्व डेपोंची तात्काळ सफाई झाली पाहिजे अन्यथा तुमची सफाई होईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSaam Digital
Published On

CM Eknath Shinde

एसटी ही महाराष्ट्राची लाईफ लाईन असून एसटी महामंडळाच्या ताफ्यात 5150 इलेक्ट्रीक बसेसचा समावेश होत आहे. स्पर्धात्मक युगात जगताना आपल्याला पर्यावरणाचा समतोलही राखायचा आहे. एसटी डेपोंची अवस्था पाहिली आहे. या सर्व डेपोंची तात्काळ सफाई झाली पाहिजे अन्यथा तुमची सफाई होईल, असा इशारा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५१५० इलेक्ट्रिक बस योजनेचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी एसटी डेपोची अवस्था पाहून ते संतप्त झालेले पहायला मिळाले.

गावखेड्यात जाणाऱ्या बसमध्ये एसी नव्हत्या मात्र आता गावखेड्यात देखील एसी बसेस फिरताना दिसतायेत. शहराप्रमाणे ग्रामीण भागातील लोक ही एसी मधून फिरले पाहिजेत यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला फायदा कसा होईल याचा विचार केला पाहिजे. चांगली सेवा जो कर्मचारी देईल त्यांना प्रोत्साहन भत्ता द्या.मला धावणारा अधिकारी पाहिजे थांबणारा अधिकारी असेल तर त्याला बाहेर काढलं जाईल. एसटी महामंडळात बदल दाखवा अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेला, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CM Eknath Shinde
Shivaji Maharaj Jayanti: न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासात घुमणार ‘शिवबाचं नाव’, शिवप्रेमींमध्ये भरणार ऊर्जा

मुख्यमंत्र्यांच्या गावाला चांगल्या गाड्या पाठवा

600 कोटी बस डेपोच्या सुशोभीकरणासाठी दिले आहे. केंद्र सरकार देखील निधी देणार आहे. चांगलं काम करतो त्याला सन्मान करतो असं म्हणत साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुक केलं होतं. एसटीप्रमाणे माझी गाडी देखील लोक हाथ दाखवून थांबवतात. मी ही लोकांपोटी जिव्हाळा असल्याने थांबतो. एसटीच्या कर्मचाऱ्यांपासूनचे सर्व विषय माझ्या सोबत एक बैठक घेऊन माडां, मी एका झटक्यात सगळे प्रश्न सोडवेन. मात्र मुख्यमंत्र्यांच्या गावाला चांगल्या गाड्या पाठवा बंद गाड्या पाठवू नका.

CM Eknath Shinde
Uddhav Thackeray: शेतकऱ्यांची गॅरंटी कोण घेणार? शेतकरी आंदोलनावरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com