सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील कांदा विक्रीसाठी स्वातंत्र्य बाजारपेठ सुरू झाली आहे. यामुळे आजूबाजूच्या (Nandurbar) परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोयीचे झाले आहे. या बाजार समितीत कांदा (Onion) खरेदीला सुरवात झाली असून मागील १२ दिवसात ६ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. (Live Marathi News)
कांदा विक्रीसाठी नंदुरबारमध्ये नव्याने सुरु झालेल्या बाजार समितीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता इंदौर, अहमदाबाद आणि लासलगाव बाजार समितीत (Bajar Samiti) जाण्याची गरज पडत नाही. यामुळे नंदुरबार कांदा बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. १२ दिवसात सहा हजार क्विंटल कांद्याची आवक आली आहे. सध्या कांद्याला ७५० ते १२५० रुपये पर्यंतच्या दर मिळत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शेतकऱ्यांचा वाचतोय पैसा आणि वेळ
त्यासोबत दुसऱ्या मार्केटला जाण्याची गरज पडत नसल्यामुळे पैसा आणि वेळ दोघेही वाचत असल्याने शेतकऱ्यांना (Farmer) दोन पैसे अधिकचे मिळत आहेत. पुढील महिन्यात आवक आणखीन वाढण्याची शक्यता बाजार समितीकडून वर्तवण्यात आलेली आहे. पिंपळगाव बाजार समितीच्या दर नंदुरबार बाजार समितीत मिळत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.