Dhule News : भिंतीवर सॉरी डॅड लिहत मुलाने संपविले जीवन; स्पर्धा परीक्षेच्या तयारीस नकार दिल्याने  पाऊल

Dhule News : केतन अकलाड मोराणे प्र.ल. येथील सैनिकी छत्रपती शिवाजी सैनिकी शाळेत होता. त्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याची इच्छा होती
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : आई- वडिलांनी परिस्थितीअभावी एमपीएसएसी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास नकार दिला. त्यामुळे (Dhule) नैराश्‍यातून केतन मोरे याने वसतिगृहातील बाथरूममध्येच गळफास घेत जीवनयात्रा संपविली. त्याने भिंतीवर ‘सॉरी डॅड’ असे लिहिले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली. या प्रकरणी तालुका पोलिस (Police) ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. (Tajya Batmya)

Dhule News
Eknath Khadse Tweet : भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या फक्त अफवा; खडसेंचे ट्विट करत स्पष्टीकरण


सुट्रेपाडा (ता. धुळे) येथील केतन अकलाड मोराणे प्र.ल. येथील सैनिकी छत्रपती शिवाजी सैनिकी शाळेत होता. त्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याची इच्छा होती. त्याने ही अपेक्षा वडिलांना सांगितली. मात्र, वडील शेती करत असल्याने त्यांनी स्पर्धा परीक्षेचा खर्च आपल्याला झेपवणार नाही, असे सांगत स्पर्धा परीक्षेच्या तयारीस नकार दिला. त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट केतनने मनाला लावून घेतली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule News
Dhule News : गो तस्करी रोखण्यासाठी गोरक्षक सेलची स्थापना; आतापर्यंत ३० कारवाया

शाळेत गेल्यानंतर वसतिगृहातील भिंतीवरही (MPSC) ‘एमपीएससी, यूपीएससी’ असे लिहिले होते. आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे त्याला वाटले असावे. यातूनच त्याने सकाळी सैनिक शाळेतील वसतिगृहाच्या बाथरूमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने भिंतीवर ‘सॉरी डॅड, दादा, ताई’ असे लिहिले होते. त्याने आत्महत्या केल्याचे समजताच वसतिगृहातही खळबळ उडाली. याबाबत शाळेतील शिक्षक प्रमोद साळुंके यांनी केतनच्या पालकांना फोनद्वारे माहिती दिल्यानंतर ते शाळेत दाखल झाले. त्यांनी केतनचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com