Eknath Khadse
Eknath KhadseSaam tv

Eknath Khadse Tweet : भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या फक्त अफवा; खडसेंचे ट्विट करत स्पष्टीकरण

Jalgaon News : आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता लोकसभा निवडणूक तोंडावर असताना खडसे हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.
Published on

जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र (BJP) भाजपमध्ये प्रवेश करणार नसून या सर्व अफवा असल्याचे ट्विट करत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते (Eknath Khadse) आमदार एकनाथ खडसे यांनी ट्विट करत जाहीर केले आहे. (Breaking Marathi News)

Eknath Khadse
Shindkheda Crime : ओढणीने गळा आवळून मुलीची हत्या; संशयातून मेहुण्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश केला होता. यानंतर आता लोकसभा निवडणूक तोंडावर असताना खडसे हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पत्रकारांशी बोलतांना याचे सूतोवाच करत खडसे हे वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली होती. यामुळे खडसे भाजपा त प्रवेशाची चर्चा वेगाने सुरू होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Eknath Khadse
Rasta Roko Andolan : पीक विम्याची रक्कम मिळेना... संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता राेकाे, धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्प

खडसेंचे ट्विट 
दरम्यान, भाजप प्रवेशाबाबत होत असलेल्या चचर्चेवर आमदार एकनाथ खडसे यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून यात त्यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा माझ्याबाबत संभ्रम निर्माण व्हावा, म्हणून पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करावे. असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com