Rasta Roko Andolan : पीक विम्याची रक्कम मिळेना... संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता राेकाे, धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्प

मागण्या मान्य झाल्यास संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू असा आक्रमक इशारा शेतकरी आंदाेलकांनी प्रशासनास दिला. या आंदाेलनाप्रसंगी पाेलिसांचा बंदाेबस्त हाेता.
farmers rasta roko andolan at dhule solapur highway near sambhajinagar
farmers rasta roko andolan at dhule solapur highway near sambhajinagar saam tv
Published On

- रामू ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

पीक विमा (crop insurance) मिळावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी एकत्र येत आज (मंगळवार) छत्रपती संभाजीनगर मध्ये धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (dhule solapur national highway) झालटा फाटा येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. या रास्ता राेकाेमुळे वाहतुक विस्कळीत झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पीक विम्याचे पैसे शेतक-यांना अद्याप मिळाला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. शासनाने लवकरात लवकर पैसे द्यावेत यासाठी शेतकरी आंदाेलन करु लागले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे आंदाेलक शेतक-यांनी साम टीव्हीशी बाेलताना जिल्हा कृषी अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. यामुळे आजचे आंदाेलन छेडण्यात आले आहे असे सांगितले.

farmers rasta roko andolan at dhule solapur highway near sambhajinagar
Nagar : नगर जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला बंदी : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

यावेळी शेतक-यांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. शेतक-यांना सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान मागण्या मान्य झाल्यास संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू असा आक्रमक इशारा शेतकरी आंदाेलकांनी प्रशासनास दिला. या आंदाेलनाप्रसंगी पाेलिसांचा बंदाेबस्त हाेता. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

farmers rasta roko andolan at dhule solapur highway near sambhajinagar
Bharat Bandh News : 16 फेब्रुवारीला औद्योगिकसह ग्रामीण भारत बंदची हाक : आडम मास्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com