देशातील सर्व कामगार संघटना, शेतकरी संघटना, विद्यार्थी संघटना, युवक संघटना यांच्या माध्यमातून येत्या 16 फेब्रुवारीला औद्योगिक आणि ग्रामीण भारत बंदची (bharat bandh on 16 february 2024) हाक देण्यात आली आहे. याबाबतची माहिती माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम (narasayya adam) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)
माकपचे जेष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम म्हणाले शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, शेतमाला हमीभाव, कामगाराला किमान वेतन, कामगार कायद्यातील बदल, महागाई, बेरोजगारी या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.
या बंदच्या माध्यमातून सरकारला जाग येईल अशी आशा आहे. येत्या 16 फेब्रुवारीला सोलापुरात 50 हजार कामगारांचा मोर्चा माकप काढणार असल्याचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी नमूद केले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.