उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झाशीमध्ये एका विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. अंघोळ करणाऱ्या महिलेला पाहण्याच्या नादामध्ये एका तरुणाचा घराच्या छतावरून पडून मृत्यू झाला. सोमावारी झाशीमध्ये ही घटना घडली. पण तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याला छतावरून ढकलून देण्याचा आरोप केला आहे. पूर्ववैमनस्यातून मुलाची हत्या झाल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Jhansi Police) ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.
झाशीच्या जुन्या शहरामध्ये ही घटना घडली. मंजूर खान असं मृत तरुणाचे नाव आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असतानाच झाशी पोलिसांसमोर धक्कादायक बाब समोर आली. एसपी सिटी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, मृत मंजूरला मद्यपानाचे व्यसन होते. शेजारी राहणारी महिला अंघोळ करत होती. यावेळी मंजूर हा घराच्या छतावर चढला आणि अंघोळ करणाऱ्या महिलेला चोरून पाहत होता.
मंजूरचे अंघोळ करणाऱ्या आईला पाहत असल्चाची बाब महिलेचा मुलगा सोनूच्या लक्षात आली. संतप्त झालेल्या सोनूने मंजूरला अडवण्याचा प्रयत्न केला. सोनू देखील टेरेसवर चढला. त्याला पाहून दारूच्या नशेत असलेला मंजूर घाबरला. यावेळी पळून टाण्याच्या प्रयत्नामध्ये मंजूर टेरेसवरून खाली पडला आणि गंभीर जखमी झाला.
जखमी मंजूरला त्याच्या कुटुंबीयांनी आधी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारासानंतर त्याला झाशी वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मंजूरच्या कुटुंबीयांनी गोंधळ घातल याप्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी अंघोळ करणाऱ्या महिलेचा मुलगा सोनूचे आणि मंजूरचे जुने वैर होते. त्यामुळे त्याने जाणीवपूर्वक मंजूरला बेदम मारहाणा केल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत सोनूला अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.