केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या फेक व्हिडीओ (Amit Shah Fake Video) प्रकरणी दिल्ली पोलिस (Delhi Police) अॅक्शन मोडमध्ये आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली. दोन्ही आरोपी आम आदमी पार्टी (Aam Aadami Party) म्हणजेच आप आणि काँग्रेसशी (Congress) संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना याप्रकरणाच्या चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, आप आणि काँग्रेसशी संबंधित दोन जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. अहमदाबाद सायबर क्राइम टीमने ही कारवाई केली आहे. सोमवारी आसाम पोलिसांनी सांगितले होते की, याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून लॅपटॉप आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आलेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले होते की, 'अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव रीतोम सिंह असे आहे.'
सोशल मीडियावर नुकताच अमित शाह यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ फेक असून यामध्ये अमित शाह भारतीय जनता पक्षाचा विजय होताच एससी/एसटी आणि ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल असे बोलताना दिसत आहेत. पण खऱ्या व्हिडीओमध्ये अमित शाह वेगळंच बोलताना दिसत आहे. 'मोदी सरकार सत्तेत आले तर मुस्लीम समुदायला दिलं जाणारं आरक्षण हे रद्द केलं जाईल.', असं विधान अमित शहा यांनी केले होते. अमित शाह यांचा हा व्हिडीओ २०२३ मधील तेलंगणात झालेल्या सभेतील भाषणाचा आहे.
याप्रकरणी भाजपने काँग्रेसच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आणि आरोप केला की, त्यांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी अमित शाह यांचा फेक व्हिडीओ प्रसारित केला. याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी अमित शाह यांचा फेक व्हिडीओ पसरवणाऱ्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल सायबर विंगने आयपीसी कलम लावलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.