Prajwal Revanna: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरण: 'जेडीएस'चे खासदार प्रज्वल रेवन्नांची पक्षातून हकालपट्टी

Prajwal Revanna scandal: माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना यांच्या कथित सेक्स स्कँडल प्रकरणामुळे कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Prajwal Revanna scandal:
Prajwal Revanna scandal:Saamtv

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना यांच्या कथित सेक्स स्कँडल प्रकरणामुळे कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर आली असून जनता दल सेक्युलर पक्षाने गंभीर दखल घेत प्रज्वल रेवन्ना यांचे पक्षातून निलंबन केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एच डी देवेगौडा यांचे नातू आणि जनता दल सेक्युलर पक्षाचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. प्रज्वल रेवन्ना यांचे हजारो आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत. याप्रकरणी काँग्रेसने जनता दल तसेच भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

अशातच आता जनता दल पक्षानेही कठोर पाऊले उचलली असून खासदार प्रज्वल रेवन्ना यांचे निलंबन करण्यात आले आहे. यासंबंधी झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून कोअर कमिटीचे अध्यक्ष अध्यक्ष जीटी देवेगौडा यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

Prajwal Revanna scandal:
Jalgaon Crime : मजा मस्तीत दोन मित्रांमध्ये वाद; वादातून चाकूने केला वार

दरम्यान, खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्याशी संबंधित अश्लील व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याकडून कर्नाटकच्या डीजीपींना पत्र लिहित या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. तसेच या घटनेबाबत केलेल्या उपाययोजनांचा तपशीलवार अहवाल तीन दिवसांत आयोगाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Prajwal Revanna scandal:
Amravati News : पोलिसांची नजर चुकवत आरोपी फरार; जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी होता दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com