अमरावती मध्यवर्ती कारागृहातील कैदीला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात वार्ड नंबर १६ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हा आरोपी दाखल असलेल्या वार्डच्या बाहेर पोलीसांचा देखील पहारा होता. मात्र सदरचा आरोपी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णातून (Hospital) पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पहाटेच्या सुमारास फरार झाला आहे. सकाळी पोलिसांनी बेडवर पहिले असता आरोपी दिसून आला नाही. आरोपी फरार झाल्याची माहिती समजताच रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून शोध सुरु
आरोपी फरार झाल्याची माहिती समजताच संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून आरोपीला शोधण्यासाठी पोलिस कामाला लागले आहेत. आजूबाजूच्या परिसरात सकाळी शोध घेतला मात्र आरोपी आढळून आला नाही. यामुळे आरोपी कोठे जाऊ शकतो याचा शोध घेत याचा तपस करत शोध सुरु केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.