Kolhapur News
Kolhapur NewsSaam tv

Kolhapur News : अज्ञातांकडून मिरचीवर तणनाशक फवारणी; दीड एकर मिरचीचे नुकसान

Kolhapur News : दिवस- रात्र कष्ट करून ऐन उन्हाळ्यात हा मिरचीचा दीड एकर प्लॉट कष्टाने जगवला होता. त्यांचे उत्पन्न आता चालू झाले होते.

रणजित माजगावकर

कोल्हापूर : डिड एकर क्षेत्रात मिरची लागवड करण्यात आली होती. मात्र या मिरचीवर अज्ञातांकडून (Kolhapur) तण नाशक फवारणी करण्यात आल्याचे लक्षात आले. यामुळे संपूर्ण मिरची जळाली असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

Kolhapur News
Gangapur Dam : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी; गंगापूर धरणाची क्षमता २ कोटी १५ लाख लिटरने वाढली

कोल्हापूर- सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या दुधगाव गावालगत असलेल्या मिरचीच्या प्लांटमध्ये नुकसान झाले आहे. दुधगाव येथील सूर्यकांत गुरव आणि रामचंद्र गुरव यांनी दीड एकर शेतीमध्ये मिरचीची लागवड केलेली होती. सूर्यकांत गुरव यांच्या दीड एकर शेतामध्ये ३ महिन्यांपूर्वी मिरचीची रोपे (Farmer) लावली होती. दिवस- रात्र कष्ट करून ऐन उन्हाळ्यात हा मिरचीचा दीड एकर प्लॉट कष्टाने जगवला होता. त्यांचे उत्पन्न आता चालू झाले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मिरची तोडून मार्केटला पाठवली होती.

Kolhapur News
Jalgaon Cyber Crime : व्यापाऱ्याची ६ लाखात फसवणूक; गुंतवणुकीतून नफा मिळवून देण्याचे आमिष

पोलिसात दिली तक्रार 

या मिरचीवर काही अज्ञातांकडून तणनाशक फवारून पिकाचे मोठे नुकसान केले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते मिरची तोडण्यासाठी शेतात गेले. परंतु दीड एकर शेतामधील मिरचीची झाडे करपून गेली असल्याचे दिसून आले. ही माहिती त्यांनी गावचे पोलीस पाटील, सरपंच तसेच गावातील इतर शेतकऱ्यांना कळवली. रात्री काही अज्ञातंकडून या पिकावर तणनाशक फवारून पिकाचे नुकसान केल्याचे दिसून आले. घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीसात झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com