आम्ही देखील उमेदवारीची मागणी केली होती परंतु नारायण राणेंच्या (narayan rane) विरोधात मागणी नव्हती. आपण सर्वांनी मन मोठं ठेवून काम केलं पाहिजे. नारायण राणेंची निवडणुक युवा वर्गांने साेपी करावी असे आवाहन मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी केली. युवकांची ताकद महाविकास आघाडीकडे नाही, उद्धव ठाकरे गटाकडे (uddhav thackeray faction) देखील युवकांची ताकद नाही असेही सामंत यांनी नमूद करत राणेंच्या विजयासाठी युवा वर्गाने घरा-घरात जात प्रचार करावा असे आवाहन केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
उदय सामंत म्हणाले युवकांची नाराय़ण राणेंना खासदार म्हणुन निवडून द्यायचं आहे. कोल्हापूरच्या सभास्थानी एक लाख लोकं हाेती. त्यात 40 टक्के युवकांचा समावेश हाेता. राणेंना घराघराच न्यायचे आहे. कालची सभा अनेकांनी पाहिली, कालच्या सभेत काही नव्हते हार घालणारे लोकं नारायण राणेंच्या स्वागताला होते. फसलेली टिम काॅर्नर सभेला, फक्त शिव्या घालण्याचा कार्यक्रम होता असेही सामंत यांनी नमूद केले. दरम्यान नेत्यांवर टीका केली तर युवा वर्गांनी टीका केली पाहिजे असे सामंत यांनी म्हटले.
उदय सामंत म्हणाले महाविकास आघाडीच्या नेत्यांचे केवळ टीका करणे इतकेच काम राहिले आहे. उद्योजकांना ताकद देण्याचं सरकार शिंदे सरकारच्या रुपानं आलंय. पंतप्रधान नरेंद्र माेदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे जनहिताचे काम करीत आहेत. त्यामुळेच विराेधकांना टीका करणे एवढेच येत आहे असे सामंत यांनी स्पष्ट केले.
उदय सामंत म्हणाले तेव्हा आम्हाला चांगलं म्हटलं जातं पण या सर्व गोष्टी आम्हाला माहिती आहेत यांना आमच्या कुटुंबाचा पुळका आला आहे त्यांनीच माझ्यावर पुण्यामध्ये हल्ला केला होता, मला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. माझ्याबद्दल सहानुभूती दाखवण्याची काही गरज नाही हे कृत्य जे करतात नियती त्यांना माफ करणार नाही.
उद्धव ठाकरे रत्नागिरीत आले. त्यानंतर त्यांनी कोकणच्या जनतेसाठी काय करणार हे सांगणं अपेक्षित होतं. रिफायनरीला विरोध करून त्यांनी मत घेण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुणी पत्र लिहिलं होतं? पाच वर्षांपूर्वी हेच लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात होते. पण देशातील जनता मोदींसोबत आहे असे सामंत यांनी स्पष्ट केले.
छत्रपतींच्या गादीचा अपमान कोणी केला?
छत्रपती संभाजीराजे यांच्या बाबतीत कुठल्या मंत्र्यांना फोन केला? त्यांच्याकडून काय एफिडेव्हिट लिहून घेण्यात आलं? त्याबाबतची पत्रकार परिषद मी एक मे रोजी कोल्हापुरमध्ये घेणार. त्यावेळी छत्रपतींच्या गादीचा अपमान कोणी केला? त्याची उत्तरे मिळतील लाव रे तो व्हिडिओच्या स्टाईलने ही पत्रकार परिषद असणार असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.