- बालाजी सुरवसे
माझ्या वडिलांच्या खूनाचा विषय मी कधीच राजकारणासाठी काढला नाही पण विराेधकांना तसं वाटतं असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवनराजे निंबाळकर (pawanraje nimbalkar) यांच्या हत्येचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात देवून एका महिन्यात खटल्याचा निकाल लावावा असे आव्हान ओमराजे निंबाळकर (omprakash rajenimbalkar) यांनी देत मंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) यांच्या टीकेस देखील प्रतिउत्तर दिले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर बार्शी येथील सभेत टीका करताना वडिलांच्या खूनाचे राजकारण ओमराजे करत असल्याचा आराेप केला. त्यावर ओमराजे निंबाळकर यांनी आक्रमक होत सावंतांवर जोरदार हल्लाबोल केला. भरसभेत तानाजी सावंत यांचा खेकडामंञी असा उल्लेख केला.
ओमराजे म्हणाले मी माझ्या आजपर्यंतच्या निवडणूकीच्या भाषणात एखदाही पवनराजे यांच्या हत्येचा विषय काढला नाही. उलट पवनराजे ह्यात असते तर ओमराजे बघायला ही भेटला नसता. इंजिनिअरिंग करुन तिकडच बसला असता. बरं माझ्या वडीलांची हत्या झाली हे काय खोट आहे का? असा सवाल ओमराजेंनी उपस्थित केला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. पवनराजे यांच्या हत्येच प्रकरण शेवटच्या टप्प्यात आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण द्या एका महिन्यात निकाल लावा असे आवाहन ओमराजेंनी करत तुमच्या हातात हे आहे पण का देत नाही कारण त्यांना माहिती आहे की दोषी सापडणार आहे असे म्हटलं.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.