Jalgaon Cyber Crime : व्यापाऱ्याची ६ लाखात फसवणूक; गुंतवणुकीतून नफा मिळवून देण्याचे आमिष

Jalgaon News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कारण्यास भाग पडले. तसेच गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शर्मा दाखविले.
Jalgaon Cyber Crime
Jalgaon Cyber CrimeSaam tv

जळगाव : ऑनलाईन फसवणूक करण्याचे वेगवेगळ्या प्रकारे फंडा वापरला जात आहे. सध्या गुंतवणूक करण्याचे सांगत जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष देत (Fraud) फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. असाच प्रकार (Jalgaon) जळगावात समोर आला असून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष देत एका व्यापाऱ्याची ५ लाख ९५ हजारांत फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.

Jalgaon Cyber Crime
Navi Mumbai crime : उरणमधील महिलेच्या हत्येचा उलगडा; पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

जळगाव शहरातील जयनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या हेमेंद्र राजेंद्र शर्मा हे व्यापार करतात. दरम्यान त्यांना राम इनव्हेस्टमेंट नावाच्या व्हाट्सअप गृपच्या माध्यमातून गृप ऍडमिन गुरूराम या नावाच्या व्यक्तीने हेमेंद्र शर्मा यांच्याशी संपर्क केला. यानंतर त्याने हेमंत यांचा विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Cyber Crime) कारण्यास भाग पडले. तसेच गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शर्मा दाखविले. त्यानुसार शर्मा यांना टेकस्टार कंपनीचे शेअर खरेदी करण्यास सांगत गुरूराम नामक व्यक्तीने टेकस्टार हे अप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगितले. 

Jalgaon Cyber Crime
Gangapur Dam : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी; गंगापूर धरणाची क्षमता २ कोटी १५ लाख लिटरने वाढली

शर्मा यांनी अँप डाऊनलोड केल्यानंतर ८ फेब्रुवारी २०२४ ते ४ एप्रिल २०२४ दरम्यान त्यांच्या खात्यातून एकुण ५ लाख ९५ हजार रूपये परस्पर काढून घेतले. त्यानंतर त्यांना मुद्दल आणि नफा परत मिळाला नाही. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शर्मा यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुरूराम नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com