Jalgaon Crime : दोन मित्रांमधील थट्टामस्करीचा शेवट झाला भयानक; जळगावमधील घटना सुन्न करणारी

Jalgaon News : जळगाव शहरातील समतानगर परिसरात ही घटना घडली. समतानगर परिसरात वास्तव्यास असलेले पवन राठोड व किरण गायकवाड हे दोघे मित्र गप्पा करत बसले होते
Jalgaon Crime
Jalgaon CrimeSaam tv

जळगाव : मित्रांमध्ये सुरु असलेली मस्ती एकाच्या जीवावर उठली. मजा मस्ती करत असताना क्षुल्लक कारणावरून (Jalgaon) वाद होऊन एकाने मित्राच्या गळ्यावर वार केला. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Jalgaon Crime
Amravati News : पोलिसांची नजर चुकवत आरोपी फरार; जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी होता दाखल

जळगाव शहरातील समतानगर परिसरात ही घटना घडली. समतानगर परिसरात वास्तव्यास असलेले पवन राठोड व किरण गायकवाड हे दोघे मित्र गप्पा करत बसले होते. या दरम्यान त्यांच्यात मजा-मस्‍ती सुरू होती. या (Crime News) मजा मस्तीत पवनने किरणला शिवी दिली. शिवी दिल्याचा राग आल्याने किरणने मित्राच्या थेट गळ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. 

Jalgaon Crime
Beed Lok Sabha : बीड लोकसभेच्या रिंगणात आता ४१ उमेदवार; १४ उमेदवारांची माघार

जिल्हा रुग्णालयात दाखल 

यात गंभीर जखमी झालेल्या पवनला लागलीच जिल्‍हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरु असून पवनच्या जबाबावरून रामानंदनगर (Police) पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. सहाय्यक निरीक्षक रोहिदास गभाले तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com