China Supercarrier Warships : चीनने दक्षिण समुद्रात उतरवली सर्वात अत्याधुनिक सुपरकॅरियर युद्धनौका; अमेरिकेलाही देणार टक्कर

Supercarrier Warships : चीनने आपली पहिली सुपरकॅरियर युद्धनौका समुद्रात उतरवली आहे. चीनचीही तिसरी विमानवाहू युद्धनौका आहे, अमेरिकेच्या बाहेर बनवण्यात आलेलीही सर्वात अत्याधुनिक एयरक्राफ्ट कॅरियर आहे.
China Supercarrier Warships
China Supercarrier Warships Saam Digital

चीनने आपली पहिली सुपरकॅरियर युद्धनौका समुद्रात उतरवली आहे. चीनचीही तिसरी विमानवाहू युद्धनौका आहे, अमेरिकेच्या बाहेर बनवण्यात आलेलीही सर्वात अत्याधुनिक एयरक्राफ्ट कॅरियर आहे. फुजियान असं या युद्धनौकेचं नावं असून चीन च्या फुजियान प्रांतावरून हे नाव ठेवण्यात आलं आहे. चीनची ही पहिली कॅटोबार एअरक्राफ्ट असून चीनच्या भूमिवरच या युद्धनौकेची निर्मिती करण्यात आली आहे.

फुजियान सुपरकॅरियर ही टाइप-03 विमानवाहू जहाज आहे. ज्याचे डिस्प्लेसमेंट 71,875 टन आहे. 316 मीटर लांबीच्या या युद्धनौकेचा बीम 249 फूट उंच आहे. कॅटोबार म्हणजे लढाऊ विमाने गोफणीसारख्या स्ट्रिंगच्या मदतीने टेक ऑफ करतील आणि उतरतील, अशी यंत्रणा या युद्धनौकेवर असणार आहे. ही चीनची सर्वात आधुनिक आणि धोकादायक विमानवाहू युद्धनौका आहे. यामध्ये लढाऊ विमानांच्या टेकऑफ आणि लँडिंगसाठी प्रत्येकी तीन लहान धावपट्टी बनवण्यात आल्या आहेत. 2018 पासून शांघायजवळ ईशान्येला असलेल्या जिआंगनान शिपयार्डमध्ये या युद्धनौकेची बांधणी केली जात होती.

China Supercarrier Warships
Narendra Modi Exclusive : अभिजित पवार यांनी PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; देशभरासह महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

ही युद्धनौका HQ-10 शॉर्ट रेंज सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्र प्रणाली आणि स्वसंरक्षणासाठी 30 mm H/PJ-11 ऑटोकॅननने सुसज्ज असेल. रडार यंत्रणाही आयताकृती आहे, म्हणजेच ती लांब अंतरावरून येणाऱ्या क्षेपणास्त्रांचा आणि लढाऊ विमानांचा मागोवा घेऊ शकते. याशिवाय चीन आपली J-15B फायटर जेट यावर तैनात करेल असं मानलं जात आहे. नेक्स्ट जनरेशन फायटर J-35 आणि गरज पडल्यास J-15D इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर फायटर जेटही तैनात केले जाईल. या युद्धनौकेवर चीन KJ-600 AEWC विमानही तैनात करणार आहे. जेणेकरून समुद्रात हेरगिरी करता येईल.

China Supercarrier Warships
Arvind Kejriwal: निवडणुकीपूर्वी केजरीवालांना अटक का? कोर्टाने ईडीला विचारले हे 5 प्रश्न

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com