Salman Khan: अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याचा कट; पोलिसांनी ५ व्या आरोपीला ठोकल्या बेड्या

Salman Khan assassination Plan Accused Arrested: सलमान खान प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आलीय. पोलिसांनी हत्याच्या कटात सहभागी असलेल्या पाचव्या आरोपीला अटक करण्यात आलीय. हरियाणा पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलंय.
Salman Khan: अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याचा कट; पोलिसांनी ५ व्या आरोपीला ठोकल्या बेड्या
Salman Khan assassination Plan Accused Arrested

सिद्धेश म्हात्रे , साम प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या कटात सहभागी असलेल्या पाचव्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केलीय. हरियाणामधील भिवाणी येथून जॉनी वाल्मिकी या आरोपीला अटक करण्यात आलीय. सलमान खानवरील हल्ला प्रत्यक्षात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची आणि आरोपींच्या राहण्याची व्यवस्था जॉनी वाल्मिकी करणार होता. जॉनी हा विडिओ कॉलद्वारे आरोपींच्या संपर्कात होता.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीपासून सलमान खानच्या जीवाला धोका आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली अशून बिष्णोई टोळीमागे हात धुवून लागलीय. या गोळीबार प्रकरणानंतर पनवेलच्या फार्महाऊसमध्ये सलमान खानवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. हरियाणा पोलिसांनी बिश्नोई टोळीतील एका 37 वर्षीय आरोपीला अटक केलीय. जो अभिनेताला त्याच्या पनवेल फार्महाऊसवर मारण्याचा कट रचत होता. जॉनी वाल्मिकी असे या व्यक्तीचे नाव आहे. या आरोपीला हरियाणातील भिवानी येथून अटक करण्यात आलीय.

सलमान खान याला गाडीत, घरात किंवा फार्महाऊसमध्ये घुसून अथवा शूटिंगस्थळी मारण्याचा बिष्णोई गँगचा प्लॅन होता. यासाठी सलमान खानची रेकी करण्यासाठी नवी मुंबई, ठाणेसह परराज्यातील 50 ते 60 जणांना यासाठी कामाला लावण्यात आले होते. सलमान खानला मारण्यासाठी पाकिस्तानवरून AK47, AK92 आणि M16 जी सिद्धू मुसेवालाच्या हत्येवेळी वापरण्यात आली होती, अशी अत्याधुनिक शस्त्र मागविण्यात येणार होती.

यासोबतच सलमानवर गोळ्या चालविण्यासाठी 18 वर्षाखालील मुलांचा वापर करण्यात येणार होता, अशी धक्कादायक माहिती नवी मुंबई पोलीसांनी अटक केलेल्या चार आरोपीकडून समोर आली होती. आता याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून या कटासंदर्भात अधिक माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Salman Khan: अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याचा कट; पोलिसांनी ५ व्या आरोपीला ठोकल्या बेड्या
Sonakshi Sinha Birthday : सलमान खानने 'दबंग'साठी सोनाक्षी सिन्हाकडे कोणती अट ठेवली होती ?, जाणून घ्या...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com