Salman Khan Galaxy Apt Firing: 'सलमान खान यह तो ट्रेलर है...'; अनमोल बिश्नोईने घेतली जबाबदारी, फेसबुक Post Viral

Salman Khan Firing: सलमान खानच्या घराबाहेर घडलेल्या गोळीबार प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली. अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबूक अकाउंटवरुन या हल्ल्याची जबाबदारी स्विकारण्यात आलीय.
Salman Khan Galaxy Apt Firing
Salman Khan Galaxy Apt FiringSaam Tv

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. आता या गोळीबार प्रकरणात आता महत्वाची अपडेट समोर आलीय. अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबूक अकाउंटवरुन या हल्ल्याची जबाबदारी स्विकारण्यात आलीय.

रविवारी आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आता या बिश्नोई गँगमधील एका सदस्याने या गोळीबाराची जबाबदारी घेतली असून त्याने फेसबुकवर याबाबत पोस्ट व्हायरल केलीय.

Salman Khan Galaxy Apt Firing
Shashank Ketkar And Mrunal Dusanis Photo: शशांक केतकर आणि मृणाल दुसानीस ‘हे मन बावरे’नंतर पुन्हा एकत्र दिसणार? अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

गोळीबरची ज्यावेळी घटना घडली त्यावेळी भाईजानच्या घराबाहेर आरोपींनी सलग ४ राऊंड फायर केल्याची माहिती मिळाली. व्हायरल व्हिडीओमध्ये, दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आणि नंतर ते घटनास्थळावरून फरार झाले. त्या दोन्हीही आरोपींनी हेल्मेट घातलेलं होतं. अशातच सध्या सोशल मीडियावर बिश्नोई गँगमधील एका सदस्याची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्या सदस्याचे नाव अनमोल बिश्नोई असं आहे.सध्या त्याच्या फेसबुक अकाऊंटचे व्हेरिफिकेशन मुंबई पोलिस सत्यता पडताळत आहेत. हल्ल्याप्रकरणी, मुंबई पोलिसांनी काही पथक केले आहे. सीसीटिव्ही फुटेज आणि मोबाईल सीडीआरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी तपासाला सुरूवात केलेली आहे.

Salman Khan Galaxy Apt Firing
Swapnil Joshi Post: ‘प्रभुचं दर्शन, सरयू नदीची आरती, हनुमान गढीचं दर्शन...’; स्वप्नील जोशी अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होत सांगितला अनुभव

व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये बिश्नोई गँगमधील सदस्याने लिहिले की, “सलमान खान आम्ही तुला फक्त हे ट्रेलर दाखवण्यासाठी केले आहे. कारण तु आमच्या ताकदीला समजायला हवे. ही फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग आहे. यानंतर बंदुकाच्या गोळ्या खाली घरावर नाही चालणार, तर भरलेल्या घरावर चालतील. बाकी मला जास्त बोलायला नाही आवडत...” आणि पोस्टच्या शेवटच्या भागामध्ये लॉरेन्स बिश्नोई ग्रुपचं नाव लिहिलं आहे. त्यासोबतच ग्रुपमधील काही सदस्यांचेही नावं लिहिलेली आहे.

Anmol Bishnoi Post
Anmol Bishnoi PostSaam Tv

या गोळीबारामध्ये, कोणीही जखमी झालेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा घटना घडली तेव्हा सलमान खान (Salman Khan) घरीच होता. दरम्यान, गोळीबाराची घटना घडताच पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली आहे. याआधीही सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिष्णोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. काही दिवसांपूर्वी अभिनेता-गायक गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील निवासस्थानावरही लॉरेन्स बिश्नोईने हल्ला केला होता. सलमान खानसोबतच्या जवळच्या संबंधांमुळे हा हल्ला झाल्याचे म्हटले होते. सलमान खानला सध्या वाय प्लस सुरक्षा पुरवली जाते.

Salman Khan Galaxy Apt Firing
Gaurav More Post: "तुमचे उपकार कधीच विसरणार नाही..."; बाबासाहेबांच्या जयंतीदिनी 'तो' फोटो शेअर करत गौरव मोरेची खास पोस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com