Madhavi Latha : माधवी लता यांना Y प्लस सुरक्षा; हैदराबादमधून ओवैसींना टक्कर देणार, कोण आहेत भाजपच्या उमेदवार माधवी लता?

Madhavi Latha vs asaduddin owaisi : हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून भाजप नेत्या माधवी लता यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर माधवी लता यांना गृह मंत्रालयाकडून वाय प्लस सुरक्षा जाहीर झाली आहे.
Madhavi Latha : माधवी लता यांना Y प्लस सुरक्षा; हैदराबादमधून ओवैसींना देणार आव्हान, कोण आहेत भाजपच्या उमेदवार माधवी लता?
Madhavi LathaSaam tv
Published On

Madhavi Latha Latest news :

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून भाजप नेत्या माधवी लता यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर माधवी लता यांना गृह मंत्रालयाकडून वाय प्लस सुरक्षा जाहीर झाली आहे. त्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघात खासदार असदुद्दीन ओवैसी यांना आवाहन देणार आहेत. गृह मंत्रालयाला मिळालेल्या आयबीच्या धमकीच्या रिपोर्टच्या आधारावर माधवी लता यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

माधवी लता यांच्या सुरक्षेसाठी वाय-प्लस कॅटेगरीमध्ये सशस्त्र पोलीस दलाचे ११ कमांडो तैनात असणार आहेत. तसेच पाच पोलीस त्यांच्या घराजवळ असणार आहेत. त्याचबरोबर ६ पीएसओ तीन शिफ्टमध्ये व्हीआयपी सुरक्षा देतील.

कोण आहेत माधवी लता?

माधवी लता या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्या आहेत. भाजपने त्यांना असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात हैदराबादमधून उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे.

हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय?

हैदराबाद लोकसभा मतदारसंघ हा एमआयएम पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघावर १९८४ सालापासून ओवैसी कुटुंबाचं वर्चस्व आहे. असदुद्दीन ओवैसी यांचे वडील सुल्तान सलाहुद्दीन यांनी पहिल्यांदा या मतदारसंघातून १९८४ साली लोकसभा निवडणूक लढवली होती. ते २० वर्ष या मतदारसंघाचे खासदार होते. सध्या मतदारसंघाचं नेतृत्व असुद्दीन ओवैसी करत आहेत. तर त्यांना या लोकसभेत माधवी लता या टक्कर देणार आहेत.

Madhavi Latha : माधवी लता यांना Y प्लस सुरक्षा; हैदराबादमधून ओवैसींना देणार आव्हान, कोण आहेत भाजपच्या उमेदवार माधवी लता?
Sharad Pawar : मोदींच्या मनासारखं झालं नाही तर ते सत्तेचा गैरवापर करतात; शरद पवारांची बारामतीतून टीका

तीन तलाकवरील विधानाने आल्या होत्या चर्चेत

माधवी लता यांची कोणताही राजकीय पार्श्वभूमी नाही. हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही राजकीय घराण्यातील संबंधित नाही. त्यांची हिंदुत्ववादी म्हणून ओळख आहे. माधवी या सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याने चर्चेत राहतात. त्या तीन तलाकवरील वक्तव्यामुळे चर्चेत आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com