Sharad Pawar : मोदींच्या मनासारखं झालं नाही तर ते सत्तेचा गैरवापर करतात; शरद पवारांची बारामतीतून टीका

Sharad Pawar on Pm Modi : अरविंद केजरीवाल यांनी टीका केली म्हणून त्यांना आज जेलमध्ये टाकलंय. ही लोकशाही नसून हुकूमशाही आहे, अशी भावना देखील शरद पवारांनी व्यक्त केली आहे.
Baramati Constituency
Sharad PawarSaam TV

मंगेश कचरे

Baramati Constituency :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला? या पक्षाची निर्मिती कोणी केली? राष्ट्रवादी पक्ष आम्ही सर्वत्र पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. आज जी काही धोरणं सांगितली जातात ती समाजाच्या हिताची नाहीत. भाजपसोबत कुठल्याही परिस्थितीत जायचं नाही हा निर्णय आम्ही घेतला आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.

Baramati शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुनेत्रा पवार यांचा दौरा!| Marathi News

शरद पवार हे आज बारामती दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. बारामती तालुक्यातील सुपा येथे शरद पवारांनी कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावलीये. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवारांनी भाजपवर देखील टीका केलीये.

आमचं सरकार असताना आम्ही चारा छावण्या सुरू केल्या. मी स्वतः चारा छावणीला भेट द्यायला आलो होतो. मोदी सरकारने कांदा निर्यातीला बंदी घातली त्यामुळे कांद्याचे दर घसरलेत. काही भागात सोयाबीनचे पीक घेतले जाते. मात्र सोयाबीनच्या किंमती खाली आल्यात. उत्पादनाचा खर्च कमी होत नाही मात्र ज्यांनी पीक पिकवलं त्या पिकाची किंमत कमी होतं आहे,मोदी सरकारवर टीका करताना पवारांनी शेतकऱ्यांची सद्य परिस्थिती येथे सांगितली आहे.

आमचा संघर्ष भाजपशी आहे

मतदानाचा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. निवडणुकीच्या प्रत्येक काळात तुम्हा लोकांचा पाठिंबा आम्हाला मिळाला. मात्र यावेळी निवडणुकीत चित्र वेगळे आहे. आमचा संघर्ष हा भाजपशी आहे. आमच्यातून जे बाहेर गेले आहे त्यांच्याशी आमचा संघर्ष आहे, असंही शरद पवारांनी कार्यकर्त्यांना ठामपणे सांगितलं आहे.

भाजप म्हणजे तरुणांना नोकरीची चिंता वाढवणारा पक्ष

भाजप म्हणजे तरुणांना नोकरीची चिंता वाढवणारा पक्ष आहे. आज त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. मोदींच्या मनासारखं झालं तर ठीक, मनासारखं झालं नाही तर ते सत्तेचा गैरवापर करतात. मोदींनी मला कळवलं मला बारामतीला यायचं आहे. त्यावेळी शरद पवार यांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलोय. असं मोदींनी म्हटल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.

मोदी यांच्या मनाविरुद्ध वागल्यास सत्तेचा गैरवापर करतात

मोदी यांच्या मनाविरुद्ध एखादं राज्य वागत असेल तर त्यांच्यावर ते कारवाई करतात. आज झारखंडचे मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. अरविंद केजरीवाल यांनी टीका केली म्हणून त्यांना आज जेलमध्ये टाकलंय. ही लोकशाही नसून हुकूमशाही आहे, अशी भावना देखील शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

Baramati Constituency
Sushil Kumar Modi: भाजप नेते सुशील कुमार मोदी यांना कॅन्सर, ६ महिन्यांपासून सुरू आहे संघर्ष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com