Swapnil Joshi Took Prabhu Shri Ram Darshan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swapnil Joshi Post: ‘प्रभुचं दर्शन, सरयू नदीची आरती, हनुमान गढीचं दर्शन...’; स्वप्नील जोशी अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होत सांगितला अनुभव

Swapnil Joshi News: मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीही अयोध्येत जात प्रभु श्रीरामांचे त्याने दर्शन घेतले आहे. नुकतंच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दर्शन करते वेळेचा अनुभव शेअर केलेला आहे.

Chetan Bodke

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येमध्ये, प्रभु श्री राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. प्रभु श्रीराम मंदिरामध्ये विराजमान झाल्यानंतर दररोज लाखो रामभक्त रामललाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत. आतापर्यंत लाखो भाविकांनी रामदर्शन घेतले आहे. देशभरातील भाविक रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जात आहेत. सामान्य नागरिकांपासून अनेक दिग्गज सेलिब्रिटीही प्रभु श्रीरामाचे दर्शन घ्यायला जात आहे. अशातच मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीही अयोध्येत जात प्रभु श्रीरामांचे त्याने दर्शन घेतले आहे. नुकतंच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभु श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटन सोहळा पार पडला. अयोध्येत राम मंदिराची स्थापना झाल्यानंतर रोज लाखो भाविक दर्शनासाठी जात आहेत. अशातच मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीही तिथे जात त्याने मित्रमंडळींसोबत जाऊन रामललाचं दर्शन घेतलं. याबद्दलची पोस्ट अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे.

अनुभव सांगताना स्वप्नीलने पोस्टमध्ये लिहिले की, "२२ जानेवारी २०२४ हा दिवस माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी अत्यंत भावनिक होता. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा असा होता. प्रभू श्री रामांचं अयोध्यानगरी मधील पुनरागमन, तो उद्घाटन सोहळा, ते सगळंच अतिशय भारावून जाण्यासारखं होतं. तेव्हा सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला नाही पण एक मात्र ठरवलं होतं की ‘याची देही याची डोळा’ प्रभू श्री रामचद्रांचं दर्शन मात्र नक्की घ्यायचं."

स्वप्नील जोशीने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, "काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाण्याचा योग जुळून आला आणि सोबत होता माझा मित्र सौरभ गाडगीळ. आम्हा दोघांना आणि इतर काही मित्रमंडळींना प्रभूंच्या दर्शनाचं सौभाग्य लाभलं. प्रभूंचं दर्शन, शरयु नदीची आरती, हनुमान गढीचं दर्शन, अयोध्येतलं ते प्रसन्न वातावरण, ती सकारात्मकता.... सगळं सगळं मनाला फार उत्साह आणि ऊर्जा देणारं होतं. हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव इथे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे आज शब्द नाहीत, पण सरतेशेवटी, ‘ह्याच साठी केला होता अट्टाहास’ असं वाटलं. प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहो हीच प्रार्थना.|| जय श्री राम || " (Social Media)

अभिनयासोबतच स्वप्नीलने आता निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. 'नाच गं घुमा' चित्रपटाची निर्मिती स्वप्नीलने केली असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासोबतच स्वप्नीलच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे तर, अभिनेत्याचा लवकरच ‘बाई गं’ हा चित्रपट देखील येणार आहे. स्वप्नीलचा ‘नाच गं घुमा’ नंतर ‘बाई गं’ हा चित्रपट लगेचच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT