Salman Khan CCTV Footage: सलमान खानच्या घरावर गोळीबार; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सामच्या हाती

Salman Khan News: दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींकडून सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ साम टिव्हीच्या हाती लागला आहे
Salman Khan CCTV Footage
Salman Khan CCTV FootageSaam Tv

Salman Khan CCTV Footage

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी रविवारी (ता. १४) पहाटे ५ वाजेच्या सुमारास सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ साम टिव्हीच्या हाती लागला आहे. अभिनेत्याच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Salman Khan CCTV Footage
Birth Anniversary Of Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित 'हे' चित्रपट बघाच

यावेळी भाईजानच्या घराबाहेर आरोपींनी सलग ४ राऊंड फायर केल्याची माहिती आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आणि नंतर ते घटनास्थळावरून फरार झाले. त्या दोन्हीही आरोपींनी हेल्मेट घातलेलं होतं. ज्या ठिकाणाहून ते आरोपी पसार झाले, त्या दिशेने मुंबई पोलिस त्या आरोपींचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेत आहेत. या गोळीबारामध्ये, कोणीही जखमी झालेले नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा घटना घडली तेव्हा सलमान खान (Salman Khan) घरीच होता. दरम्यान, गोळीबाराची घटना घडताच पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली आहे. कोणत्याही अज्ञात व्यक्तीला परिसरात येण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. याआधीही सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिष्णोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमान खानला मारणे हेच त्याच्या आयुष्यातील उद्दिष्ट आहे, असं कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने एका टेलिव्हिजन मुलाखतीत घडपणे सांगितले होतं.

Salman Khan CCTV Footage
Salman Khan: मोठी बातमी! सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; दोन आरोपी फरार, परिसरात खळबळ

लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. काही दिवसांपूर्वी अभिनेता-गायक गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील निवासस्थानावरही लॉरेन्स बिश्नोईने हल्ला केला होता. सलमान खानसोबतच्या जवळच्या संबंधांमुळे हा हल्ला झाल्याचे म्हटले होते. सलमान खानला सध्या वाय प्लस सुरक्षा पुरवली जाते.

Salman Khan CCTV Footage
Bigg Boss OTT 3 यंदा होणार नाही, निर्मात्यांनी घेतला महत्वाचा निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com