Birth Anniversary Of Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित 'हे' चित्रपट बघाच

Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन उलघडणारे तामिळ, मराठी, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये असंख्य चित्रपट बनले आहेत. बाबासाहेब यांच्या आज जयंती निमित्त त्यांच्यावर बनलेल्या काही चित्रपटांवर नजर टाकूया.
Dr. Babasaheb Ambedkar Film
Birth Anniversary Of Dr. Babasaheb AmbedkarSaam Tv
Published On

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३३ वी जयंती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ ला मध्यप्रदेशातील महू मध्ये झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट बनले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन उलघडणारे तामिळ, मराठी, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये असंख्य चित्रपट बनले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज जयंती निमित्त त्यांच्यावर बनलेल्या काही चित्रपटांवर नजर टाकूया.

Dr. Babasaheb Ambedkar Film
Bigg Boss OTT 3 यंदा होणार नाही, निर्मात्यांनी घेतला महत्वाचा निर्णय

भीम गर्जना (1990)

विजय पवार यांचा 'भीम गर्जना' हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट मराठी भाषेतील आहे. भारतीय संविधान तयार करताना भारताच्या भविष्याबद्दलचे विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार यावर चित्रपट आधारित आहे.

बालक आंबेडकर (1991)

हा चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीच्या जीवनावर आधारित आहे. बसवराज केस्तुर दिग्दर्शित हा कन्नड भाषेतील चित्रपट आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (2000)

जब्बार पटेल यांच्या या चित्रपटामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कोलंबिया विद्यापीठातील महाविद्यालयीन दिवस, त्यांचा प्रवास आणि स्वातंत्र्य लढ्यातील त्यांची वाटचाल यांचा मागोवा घेण्यात आला आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. (Bollywood)

Dr. Babasaheb Ambedkar Film
Pooja Hegde: पूजा हेगडेने मुंबईत खरेदी केलं अलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क

डॉ. बीआर आंबेडकर (2005)

शरण कुमार कब्बर यांचा हा कन्नड भाषेतील चित्रपट आहे. चित्रपटामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. (Bollywood Film)

बाळ भीमराव (2018)

या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश नारायण जाधव यांनी केले आहे. हा चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर, त्यांच्या विचारसरणीवर आणि तत्त्वज्ञानावर आधारित आहे. (Entertainment News)

Dr. Babasaheb Ambedkar Film
Bade Miyan Chote Miyan Day 2 Collection: 'बडे मियाँ छोटे मियाँ'ने मारलं बॉक्स ऑफिसवरील 'मैदान'; लवकरच गाठणार १०० कोटींचा टप्पा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com