विरोधकांना लोकशाही धोक्यात दिसते, इंडिया आघाडीवर हल्लाबोल करत PM मोदी म्हणाले...
Pm Modi On India AllianceSaam Tv

Pm Modi Speech: काँग्रेसने एक देश एक संविधान लागू होऊ दिलं नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Pm Modi On India Alliance: ''काही लोक (इंडिया आघाडी) संविधान धोक्यात येईल, असा अपप्रचार करत आहेत. मी राजकारणात आल्यापासून हेच ऐकत आहे. यांच्याजवळ नविम कल्पना नाही', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
Published on

Pm Modi On India Alliance:

''काही लोक (इंडिया आघाडी) संविधान धोक्यात येईल, असा अपप्रचार करत आहेत. मी राजकारणात आल्यापासून हेच ऐकत आहे. यांच्याजवळ नविम कल्पना नाही', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. रामटेक येथे आयोजित महायुतीच्या प्रचार सभेत त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यानावर हल्लाबोल केला आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आणि म्हणाले की, ''काँग्रेसने एक देश एक संविधान लागू होऊ दिलं नाही. आज संविधानाच्या नावाने अपप्रचार करणाऱ्या लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर तुमच्यासाठी संविधान इतकेच महत्त्वाचे आहे, तर तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला संपूर्ण देशात लागू करण्याची हिम्मत का नाही दाखवली.''  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विरोधकांना लोकशाही धोक्यात दिसते, इंडिया आघाडीवर हल्लाबोल करत PM मोदी म्हणाले...
Ashok Chavan: नाना पटोलेंमुळे काँग्रेसने जागा गमावल्या, मविआच्या जागावाटपावरून अशोक चव्हाण यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात सत्तर, पंच्याहत्तर वर्षांपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान संपूर्ण देशात लागू नव्हता केला. याला जबाबदार कोण आहे? मी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशात बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान लागू केला.  (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''घराणेशाही पक्षांनी पार्टीनी संविधानिक भावनेचा विरोध केला. स्वतःचा कुटुंबाला समोर नेण्याचे काम केले. एस-एसटी वंचित राहिले. त्यांना हक्क देण्याचे काम गरीब कुटुंबातील मोदींने करून सामाजिक न्याय केला. गरिबांना पक्के घर, रेशन, उपचार, वीज, पाणी, गॅस, मोदींच्या गॅरंटीचा लाभ आदिवासी आणि एसटी लोकांनाही मिळाला.''

विरोधकांना लोकशाही धोक्यात दिसते, इंडिया आघाडीवर हल्लाबोल करत PM मोदी म्हणाले...
Maharashtra Politics: नाना पटोलेंनी मला काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची दिली ऑफर, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

मतदारांना आवाहन करताना ते याआधी म्हणाले की, ''एकजूट होऊन देशाचा नावावर मतदान करा, इंडिया आघडी बळकट झाली तर देशाचे तुकडे करतील.'' दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही भाषणाची सुरुवात मराठीत केली. रामटेक हे प्रभू रामाचे पावन स्थान आहे, असं ते यावेळी म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com