Maharashtra Politics: नाना पटोलेंनी मला काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची दिली ऑफर, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

Nana Patole: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मला काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली असल्याचा दावा, ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी केला आहे.
Uddhav Thackeray, Nana Patole
Uddhav Thackeray, Nana PatoleSaam Tv

>> गिरीश कांबळे

Lok Sabha Election 2024:

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मला काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली असल्याचा दावा, ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना घोसाळकर म्हणाले आहेत की, ''उत्तर मुंबई काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. मात्र सुरुवातीला उमेदवार त्यांच्याकडे नसल्याने उद्धव ठाकरे यांनी मला तयारी करायला सांगितली होती. नाना पटोले यांनी कालच मला काँग्रेसच्या चिन्हावर लढणार का? अशी ऑफर दिली. मात्र मी ती नाकारली.''  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray, Nana Patole
Maharashtra Politics 2024 : शर्मिला ठाकरे मातेसमान, आशीर्वाद घ्यायला नक्की जाणार; मनसेचा उल्लेख करत वसंत मोरे म्हणाले...

ते म्हणाले आहेत की, ''स्थानिक कार्यकर्त्यांचं (ठाकरे गटाच्या) म्हणणं आहे की, उत्तर मुंबई शिवसेनेने लढावी. आता महाविकास आघाडीचे नेते संदभार्त निर्णय घेतील.''

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलताना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजना घाडी म्हणाल्या की, ''उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे की उत्तर मुंबईची सीट लढावी. मात्र ही सीट गृहीत धरली नव्हती. ती जागा काँग्रेसची आहे आणि शिवसेना पूर्ण ताकद देणार, असं ठरले होतं. पण जेव्हा उमेदवार नाही, असं कळल्यावर शिवसेनेत गेल्या दोन ते तीन आठवड्यात विनोद घोसाळकर यांच्या नावावर चर्चा झाली.''  (Latest Marathi News)

Uddhav Thackeray, Nana Patole
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: २५ वर्षांत केलेलं एक तरी काम दाखवावं, देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

त्या पुढे म्हणाल्या की, ''सर्वात मोठा भाऊ (काँग्रेस) राज्यात छोटा भाऊ आहे, असं पाहून ही जागा आम्हाला द्यावी आणि यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीचे केंद्रात सत्ता येईल. घोसाळकर हे स्थानिक चांगले उमेदवार आहेत. त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार तिथे नाही, असं वर्ष गायकवाड सुद्धा सांगण्यात आल्या आहेत.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com