Bade Miyan Chote Miyan Day 2 Collection: 'बडे मियाँ छोटे मियाँ'ने मारलं बॉक्स ऑफिसवरील 'मैदान'; लवकरच गाठणार १०० कोटींचा टप्पा

Bade Miyan Chote Miyan Worldwide Collection: चित्रपटाची फक्त देशातच नाही तर, परदेशातही जोरदार कमाई सुरू आहे. जगभरामध्ये अक्षय आणि टायगरच्या चित्रपटाने दोन दिवसांतच कोट्यवधींची कमाई केली आहे.
Bade Miyan Chote Miyan Day 2 Worldwide Collection
Bade Miyan Chote Miyan Day 2 Worldwide CollectionSaam Tv

Bade Miyan Chote Miyan Day 2 Worldwide Collection

सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या आणि टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाची जोरदार कमाई सुरू आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त देशातच नाही तर, परदेशातही जोरदार कमाई केलेली पाहायला मिळत आहे. नुकतंच दुसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. नुकतंच निर्मात्यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून हा कमाईचा आकडा शेअर केला आहे. चित्रपटाने जगभरामध्ये, दोन दिवसांतच ५५ कोटींच्या आसपासची कमाई केली आहे. (Bollywood)

Bade Miyan Chote Miyan Day 2 Worldwide Collection
Sayaji Shinde Health Update: ‘आता पुढे काहीही होणार नाही....’, एन्जोप्लास्टीनंतर सयाजी शिंदेंनी रुग्णालयातून व्हिडीओ शेअर करत दिली हेल्थ अपडेट

सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. २०२४ मध्ये जगभरामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे. अक्षय आणि टायगरच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.६५ कोटींची कमाई तर दुसऱ्या दिवशी फक्त ७ कोटींची कमाई देशभरामध्ये केलेली आहे. तर जगभरामध्ये चित्रपटाने पहिल्या दिवशी ३६.३३ कोटींची कमाई तर दुसऱ्या दिवशी ५५. १४ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाने फक्त दोन दिवसांतच छप्परफाड कमाई केल्यामुळे प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टायगर आणि अक्षयच्या ‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपटाने चांगलीच कमाई केलेली आहे. चित्रपटाने सर्वाधिक कमाई करत सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांमध्ये चर्चा सुरू होती.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता होती. ॲक्शन सीन्सपासून ते मनोरंजक सस्पेन्स आणि थ्रिलरपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवणारा आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाचं तब्बल ३५० कोटींचं बजेट आहे. चित्रपटाने प्रदर्शनाआधी पासूनच जोरदार कमाई सुरू केली आहे. (Bollywood Film)

Bade Miyan Chote Miyan Day 2 Worldwide Collection
Jennifer Mistry Bansiwal: भावाचा मृत्यू, बहिण व्हेंटिलेटरवर; काम मिळत नसल्याने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्री आर्थिक अडचणीत

चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, आलिया एफ आणि मानुषी छिल्लरशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. (Entertainment News)

Bade Miyan Chote Miyan Day 2 Worldwide Collection
Pushpa The Rule: 'पुष्पा द रूल'मधील ६ मिनिटांच्या सीनसाठी खर्च केले ६० कोटी, शूटिंगसाठी लागला १ महिना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com