Pm Modi On China: चीनशी संबंध महत्त्वाचे, पण आधी सीमावाद सोडवायला हवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Pm Modi News: आगामी लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि चीन सीमावादाबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
चीनशी संबंध महत्त्वाचे, पण आधी सीमावाद सोडवायला हवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Pm Modi On ChinaSaam Tv

Pm Modi On China:

आगामी लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि चीन सीमावादाबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंध महत्त्वाचे आहेत, पण आधी सीमावाद सोडवायला हवा. 'न्यूजवीक' या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी असं म्हणाले आहेत.

याशिवाय त्यांनी जम्मू-काश्मीरबाबतही महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या जीवनात जे बदल झाले आहेत, त्याबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, काश्मीर खोऱ्यात बंद, निदर्शने, दगडफेक या आता भूतकाळातील गोष्टी झाल्या आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चीनशी संबंध महत्त्वाचे, पण आधी सीमावाद सोडवायला हवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी
BJP Manifesto: एलपीजी सिलेंडर 400 रुपयात; अरुणाचल प्रदेश निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा केला प्रसिद्ध

पंतप्रधान मोदी म्हणाले की, काश्मीरमध्ये होणाऱ्या क्रीडा स्पर्धांबद्दल तरुणांमध्ये खूप उत्सुकता आहे. ते म्हणाले की, 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या लोकांना नवसंजीवनी मिळाली आहे. जम्मू आणि काश्मीर आता परदेशी शिष्टमंडळांसाठी अधिक सुलभ झाले आहे. (Latest Marathi News)

मोदी म्हणाले की, कलम 370 रद्द केल्यानंतर हा प्रदेश जागतिक कार्यक्रमांसाठी स्वागतार्ह ठिकाण बनला आहे. काश्मीर आता फॉर्म्युला 4 रेसिंग इव्हेंट्स, मिस वर्ल्ड आणि जी20 मीटिंग यांसारख्या महत्त्वाच्या मेळाव्याचे आयोजन करत आहे.

चीनशी संबंध महत्त्वाचे, पण आधी सीमावाद सोडवायला हवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Pm Modi Speech: काँग्रेसने एक देश एक संविधान लागू होऊ दिलं नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध सामान्य करण्यासाठी सीमेवरील दीर्घकाळापासून सुरू असलेला वाद सोडवायला हवा, यावर भर दिला. मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि चीनमधील स्थिर आणि शांततापूर्ण संबंध हे संपूर्ण क्षेत्र आणि जगासाठी महत्त्वाचे आहेत. ते म्हणाले, “माझा विश्वास आहे की आपल्या सीमेवरील प्रदीर्घ काळापासून सुरु असलेला वाद तातडीने सोडवणे आवश्यक आहे. जेणेकरुन आपल्या द्विपक्षीय परस्परसंवादात मतभेद मागे राहू शकतील.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com