Swapnil Joshi And Prarthana Behere News: 'मितवा' नंतर स्वप्नील आणि प्रार्थना पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करणार; नव्या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात

Swapnil Joshi And Prarthana Behere Film: तब्बल ९ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर स्वप्नील आणि प्रार्थना एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतक्या वर्षांनी या दोघांना मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Swapnil Joshi And Prarthana Behere New Film Shooting Start
Swapnil Joshi And Prarthana Behere New Film Shooting StartInstagram

Swapnil Joshi And Prarthana Behere New Film

२०१५ मध्ये रिलीज झालेल्या ‘मितवा’ चित्रपटातून स्वप्नील आणि प्रार्थना प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. चित्रपटातून आलेली ही जोडी ही आता एका नव्या कोऱ्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल ९ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतक्या वर्षांनी या दोघांना मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या त्या गाण्याच्या शुटिंग दरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या त्यांच्या BTS व्हिडीओ चाहत्यांमध्ये चर्चेत आला आहे.

Swapnil Joshi And Prarthana Behere New Film Shooting Start
Parineeti Chopra Trolled: 'आज गाने की जिद ना करो...', ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये परिणीती चोप्राने गायलं गाणं; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

प्रार्थना बेहरेने अवघ्या काही तासांपूर्वीच शेअर केला आहे. “बाई गं!!!!! गाण्याची शुटिंग सुरू आहे. लवकरच चित्रपट रिलीज होईल.” असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केलेला आहे. त्यांच्या गाण्याची शुटिंग एका समुद्र किनारी सुरू असल्याचे दिसत आहे. दोघेही या व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये, स्वप्नीलने टी शर्ट, फ्लोरल प्रिंटेड जॅकेट, जीन्स तर प्रार्थनाने ब्लू कलरची फॅन्सी साडी वेअर केलेली दिसत आहे. ‘मितवा’ चित्रपटानंतर ‘बाई गं’ चित्रपटामध्येही ही जोडी दिसणार आहे.

अभिनयासोबतच स्वप्नीलने आता निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. 'नाच गं घुमा' चित्रपटाची निर्मिती स्वप्नीलने केली असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासोबतच स्वप्नीलच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे तर, अभिनेत्याचा लवकरच ‘बाई गं’ हा चित्रपट देखील येणार आहे. ‘बाई गं’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये स्वप्नील आणि प्रार्थना व्यग्र आहे. ‘बाई गं’ चित्रपटातील गाणं शूट करण्यासाठी 'मितवा' जोडी एकत्रित आली आहे. स्वप्नीलचा ‘नाच गं घुमा’ नंतर ‘बाई गं’ हा चित्रपट लगेचच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Swapnil Joshi And Prarthana Behere New Film Shooting Start
Farzi 2 Shooting Delayed: ‘फर्जी २’च्या शुटिंगला केव्हापासून सुरूवात होणार?, राशी खन्नाने दिली महत्वाची अपडेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com