Parineeti Chopra Trolled: 'आज गाने की जिद ना करो...', ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये परिणीती चोप्राने गायलं गाणं; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Chamkila Film Trailer Event: 'अमर सिंह चमकिला' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमामध्ये दिलजीतसोबत स्टेजवर उभ्या असलेल्या परिणीतीने एक पंजाबी गाणं गाऊन दाखवलं. पण तिला गाण्यामुळे नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले आहे.
Parineeti Chopra Sings Song Trolled
Parineeti Chopra Sings Song TrolledSaam Tv

Parineeti Chopra Sings Song Trolled

दिग्दर्शक इम्तियाज अलीचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'अमर सिंह चमकिला' सध्या कमालीचा चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमामध्ये दिलजीतसोबत स्टेजवर उभ्या असलेल्या परिणीतीने एक पंजाबी गाणं गाऊन दाखवलं. पण तिला गाण्यामुळे नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले आहे.

Parineeti Chopra Sings Song Trolled
Farzi 2 Shooting Delayed: ‘फर्जी २’च्या शुटिंगला केव्हापासून सुरूवात होणार?, राशी खन्नाने दिली महत्वाची अपडेट

ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये, परिणीतीने एक पंजाबी गाणं गाऊन दाखवलं. पण परिणीतीला गाणं गायला जमलं नसल्यामुळे तिला अनेकांनी ट्रोल केलं आहे. ‘परिणीतीने तिची ही छुपी प्रतिभा छुपीच ठेवावी’, असं एकाने कमेंट करत म्हटलं आहे. तर ‘आज गाने की जिद ना करो’, असा खोचक टोला एकाने तिला मारला आहे. ‘झोपेतून उठण्यासाठी ही सर्वोत्तम अलार्म रिंगटोन असेल’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी परिणीतीच्या गायनाची खिल्ली उडवली आहे. परिणीतीचे हे गाणे नेटकऱ्यांना आवडले नसून तिला चांगलंच ट्रोल करीत आहेत.

परिणीती एक उत्तम अभिनेत्री असून ती एक उत्तम गायिकाही आहे. तिच्या गाण्याचे कौतुक अनेकदा चाहत्यांकडून करण्यात आलेले आहे. परिणीतीचं ‘केसरी’ चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ हे गाणं चांगलंच व्हायरल झालं होतं. तिला या गाण्यामुळे एक उत्तम गायिका म्हणून चांगलीच प्रसिद्धी मिळालेली आहे. त्यासोबतच परिणीतीने लग्नासाठीही एक खास गाणं गायलं होतं. तिने ‘ओ पिया’ हे गाणं गाऊन तिने आपल्या पतीला एक जबरदस्त गिफ्ट दिलेलं होतं. परिणीतीच्या लग्नातील अनेक व्हिडीओ तिच्या ह्या गाण्यावर रिल क्रिएट करत नेटकऱ्यांनी व्हायरल केले होते.

Parineeti Chopra Sings Song Trolled
Mirzapur 3 Release Date: कालीन भैय्या- गुड्डू भैय्या भिडणार!; ‘मिर्झापूर ३’च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट

इम्तियाज अली दिग्दर्शित 'अमर सिंह चमकिला' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा आहे. हा चित्रपट 'गायक अमर सिंग चमकिला' यांच्या जीवनावर आधारित आहे. संगीताच्या दुनियेत नाव कमवण्यासाठी त्यांना जगाशी कसा संघर्ष करावा लागला हे 'अमर सिंग चमकीला'च्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. चित्रपटामध्ये अमर सिंह चमकिला यांची भूमिका पंजाबी गायक दिलजीत दोसांझने साकारली आहे. तर परिणीती चोप्रा देखील मुख्य भूमिकेत असून ती गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १२ एप्रिल रोजी 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Parineeti Chopra Sings Song Trolled
Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘Swatantrya Veer Savarkar’ चित्रपटापेक्षा ‘Madgaon Express’ सुपरफास्ट, आतापर्यंतची कमाई किती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com