Gangappa Pujari
अयोध्येतील भव्य राम मंदिराचे आज मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले.
दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी हा लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी जय श्रीरामाच्या घोषणांनी अयोध्यानगरी दुमदुमून गेली होती.
प्राणप्रतिष्ठेनंतर गर्भगृहातील रामललाची पहिली छायाचित्रे समोर आली आहेत.
रामलल्लाला सोन्याच्या दागिन्यांनी मढवण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
प्रभू रामचंद्राचं तेजस्वी रुप पाहून डोळ्यांचं पारण फिटतंय.
मंत्रोच्चार आणि शंखनाद सुरू असताना पंतप्रधान मोदी अत्यंत भावूक झाले होते.