ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अयोध्येत उत्सवाच वातावरण आहे. अयोध्येतील प्रत्येक गल्ली राम भरून गेली आहे.
अयोध्या धाम जय श्री राम लिहिलेल्या फुलांनी सजवण्यात आलंय.
आजच्या खास प्रसंगासाठी रामनगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. रामायणातील विविध श्लोक असलेली पोस्टर्सही ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत.
अयोध्येत कडेकोट बंदोबस्तात जल्लोषाचं वातावरण आहे. सर्वत्र राम नामाची धून ऐकू येतेय.
अयोध्येत प्रभू राम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा करून लोक रस्त्यावर आले आहेत. भाविकही रॅलीत सामील झाले आहेत.
फुलांच्या रांगोळ्या आणि दिव्यांची सजावट शहराची शोभा वाढवत आहेत.
ठिकठिकाणी रामलीला, भागवत कथा, भजन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.