Ram Mandir: २२ जानेवारीला चित्रपटांचे शूटिंग बंद, चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, तिकीट किती रुपये?

Bollywood Movie Shooting: राम मंदिरच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बॉलिवूडपासून (Bollywood) साऊथपर्यंत अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. अशामध्ये आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे. २२ जानेवारीच्या दिवशी चित्रपटांचे शूटिंग देखील बंद राहणार आहे.
Ram Mandir Ayodhya
Ram Mandir AyodhyaSaam Digital
Published On

Ram Mandir News:

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची (Ram Mandir Pranapratistha Ceremony) संपूर्ण देशवासीयांना उत्सुकता लागली आहे. या ऐतिहासिक क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. २२ जानेवारी हा दिवस संपूर्ण देशासाठी महत्वाचा असणार आहे. म्हणून या दिवशी अनेक राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. राम मंदिरच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बॉलिवूडपासून (Bollywood) साऊथपर्यंत अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. अशामध्ये आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे. २२ जानेवारीच्या दिवशी चित्रपटांचे शूटिंग देखील बंद राहणार आहे.

२२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावेळी संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीने 22 जानेवारी म्हणजेच सोमवारी सर्व चित्रपटांचे शूटिंग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजच्या अध्यक्षांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली असून त्या दिवशी शूटिंग होणार नाही.

Ram Mandir Ayodhya
Ram Mandir: उपमुख्यमंत्र्यांनी श्रीरामांवर लिहिलं गाणं,पत्नी अमृता फडणवीसांनी गायलं; स्वत: केली घोषणा

एफडब्ल्यूआयसीईचे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी निवेदनाद्वारे चित्रपटाचे शूटिंग बंद राहणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी निवेदनात असे म्हटले आहे की, 'आम्ही या विशेष प्रसंगी सुट्टी जाहीर करतो. या दिवशी कोणत्याही चित्रपटाचे शुटिंग होणार नाही कारण आमचे सर्व कार्यकर्ते सुट्टीवर असतील.' तिवारी यांनी पुढे असेही सांगितले की, 'जर एखादी आपत्कालीन परिस्थिती असेल किंवा एखाद्याचे मोठे नुकसान होत असेल, तर अशा परिस्थितीत मदत करावी ही विनंती. यासाठी कारणासह विनंती पत्राची आवश्यकता असेल. प्रकणाचे गांभीर्य लक्षात घेऊनच शूटिंगला परवानगी दिली जाईल.'

Ram Mandir Ayodhya
Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आयशा खान, मुनव्वर फारुकीने मागितली एक्स गर्लफ्रेंडची माफी

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये उत्साहसोबतच आनंदाचे वातावरण आहे. या सोहळ्यासाठी आयोध्यमध्ये न जाता देखील देशवासियांना आहे त्या ठिकाावरून सोहळ्याचा अनुभव घेता येणार आहे. यासाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे. अयोध्येतून या प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण 70 हून अधिक शहरांतील 160 हून अधिक सिनेमागृहांमध्ये दाखवले जाणार आहे. त्याचे शुल्कही निश्चित करण्यात आले आहे. हे थेट प्रक्षेपण तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 100 रुपयांमध्ये पाहू शकता.

Ram Mandir Ayodhya
Ram Aayenge Song: जर्मनीच्या गायिकेने गायलं 'राम आएंगे' गाणं, सौंदर्यासोबत मधुर आवाजाचे झाले सारे दिवाने; एकदा VIDEO बघाच...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com