Devendra Fadnavis And Amruta Fadnavis
Devendra Fadnavis And Amruta FadnavisSaam Tv

Ram Mandir: उपमुख्यमंत्र्यांनी श्रीरामांवर लिहिलं गाणं,पत्नी अमृता फडणवीसांनी गायलं; स्वत: केली घोषणा

Devendra Fadnavis Written Song On Shri Ram: देशामध्ये सगळीकडे राममय वातावरण झाले आहे. अनेकांनी राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गाणी गायली आहेत. अनेक सेलिब्रिटींची गाणी देखील रिलीज झाली आहेत.
Published on

Ram Mandir Pranpratistha:

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे (Ram Mandir Pranapratistha Ceremony) सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या सोहळ्याची देशवासीयांना उत्सुकता लागली आहे. या ऐतिहासिक क्षणाची सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. २२ जानेवारी हा दिवस संपूर्ण देशासाठी खूपच खास असणार आहे.

देशामध्ये सगळीकडे राममय वातावरण झाले आहे. अनेकांनी राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गाणी गायली आहेत. अनेक सेलिब्रिटींची गाणी देखील रिलीज झाली आहेत. अशामध्ये आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी श्रीरामासाठी गाणं लिहिलं आहे. महत्वाचे म्हणजे त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हे गाणं गायलं आहे. स्वत: अमृता फडणवीस यांनी ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'आताच कैलाशजी यांच्यासोबत गायलेलं माझं गाणं रिलीज झालं. देवेंद्रजींनी देखील गाणं लिहिलं आहे. श्रीराम यांच्यावर हे गाणं लिहिलं आहे. या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलं आहे. त्या गाण्याचा मी देखील एक पार्ट आहे. आता मी हे गाणं गाऊ शकत नाही. कारण मला खोकला आहे. नाही तर मला तुम्ही ट्रोल करता.'

अमृता फडणवीस यांनी पुढे एका गाण्याच्या ओळी गायल्या. 'कण-कण में राम है! मन-मन में राम है! जन-जन में राम है! हर-जन में राम है! या देशाचे वातावरण राममय झाले आहे. आपण खूप प्रेमाने त्यांचे स्वागत करूया.' असं म्हणत अमृता फडणवीस यांनी सर्वांना आवाहन केले आहे. अमृता फडणवीस यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Devendra Fadnavis And Amruta Fadnavis
Yami Gautam च्या सस्पेंस-थ्रिलर 'Article 370' चा धासू टीझर आऊट, दहशतवाद्यांशी दोन हात करताना दिसली अभिनेत्री

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये उत्साहसोबतच आनंदाचे वातावरण आहे. या सोहळ्यासाठी आयोध्यमध्ये न जाता देखील देशवासियांना आहे त्या ठिकाावरून सोहळ्याचा अनुभव घेता येणार आहे. यासाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे. अयोध्येतून या प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण 70 हून अधिक शहरांतील 160 हून अधिक सिनेमागृहांमध्ये दाखवले जाणार आहे. त्याचे शुल्कही निश्चित करण्यात आले आहे. हे थेट प्रक्षेपण तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 100 रुपयांमध्ये पाहू शकता.

Devendra Fadnavis And Amruta Fadnavis
Ram Mandir: २२ जानेवारीला चित्रपटांचे शूटिंग बंद, चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, तिकीट किती रुपये?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com