Actress Mitanshi Goel Made Her Met Gala 2024 Saam Tv
मनोरंजन बातम्या

"आमच्या फुलाचं सौंदर्य खुललंय..."; 'लापता लेडिज' फेम अभिनेत्रीने Met Gala 2024 सोहळा गाजवला

Actress Mitanshi Goel Made Her Met Gala 2024 : नितांशी गोयलने 'मेट गाला २०२४' फॅशन अवॉर्डमध्ये साधी सिंपल साडी नेसून उपस्थिती लावली होती.

Chetan Bodke

बहुप्रतिक्षित 'मेट गाला २०२४' (Met Gala 2024) फॅशन अवॉर्डला ६ मे पासून दणक्यात सुरूवात झालेली आहे. या फॅशन अवॉर्डला बॉलिवूडसह हॉलिवूडमधील कलाकार अवॉर्डला उपस्थिती लावत असतात. अभिनेत्री आलिया भट्ट आणि उद्योजिका ईशा अंबानी या दोघींनीही सोमवारी फॅशन अवॉर्डला उपस्थिती लावली होती. त्यानंतर आता मंगळवारी आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने या अवॉर्ड फंक्शनला उपस्थिती लावली होती. 'लापता लेडिज' फेम अभिनेत्रीने उपस्थिती लावली आहे.

(Laapataa Ladies Actress Phool Mitanshi Goel Made Her Met Gala 2024)

'लापता लेडिज' चित्रपटामध्ये 'फूल' हे पात्र अभिनेत्री नितांशी गोयलने साकारले आहे. नितांशी गोयलने 'मेट गाला २०२४' फॅशन अवॉर्डमध्ये साधी सिंपल साडी नेसून उपस्थिती लावली होती. सोमवारी आमिर खान प्रॉडक्शनच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर 'मिसिंग लेडीज'मधील 'फूल'चा मेट गाला रेड कार्पेट लूक शेअर केला होता. नितांशी गोयलने 'लापता लेडीज'मधून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. तिच्या पात्राला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. (Bollywood News)

'मेट गाला २०२४' च्या रेड कार्पेटवर नितांशीने सिंपल रेड कलरची साडी, मरुण कलरची शाल आणि कपाळावर टिकली असा सिंपल लूक तिने केला होता. सध्या सोशल मीडियावर नितांशीच्या 'फूल' पात्राच्या लूकची जोरदार चर्चा होताना दिसते. 'लापता लेडिज' हा चित्रपट १ मार्च २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रवी किशन, प्रतिभा रंता, नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन किरण रावने केले आहे. चित्रपटाची थिएटरसह ओटीटीवरही जोरदार चर्चा होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT