

श्री वासुदेव सत्रे
ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक, मोबाईल नंबर - 9860187085
आजचे राशीभविष्य, ९ जानेवारी २०२६
मेष - जून्या चूकांचं प्रायश्चित्त भोगायची तयारी ठेवा. नम्रपणे चूक स्वीकारुन पूढे निघा. भाषेत संयम आणि मृदुता ठेवा.
वृषभ - शुक्र है शुक्रवार है, आनंदात दिवस जाईल. आप्तेष्टांना घरी बोलावून गोड जेवण द्या. विसरलेल्या मित्रांना भेटून गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
मिथुन - शत्रूंचा आपोआप नाश होईल. निश्चिंत राहा. जूने वैर काढत बसूं नका. "क्षमा विरस्य लक्षणम्" हे वाक्य लक्षात ठेवा.
कर्क - "मन एव मनुष्याणाम् कारणम् बंध मोक्षयेत्" जास्त विचार करायचा नाही. तूम्ही जो विचार कराल तसंच घडत जाईल. म्हणून आनंदी मन ठेवा.
सिंह - भरपूर दगदग होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक समस्या सहज दूर होतील. रक्तदाब असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
कन्या - बुद्धीजीवी लोकांसोबत वेळ घालवा. विनाकारण इतरांसोबत वाद टाळावेत. काही लिखाण किंवा कायदेशीर कागदपत्रे तयार करायचे असल्यास उत्तम दिवस आहे.
तूला - परदेशीय संधी चालून येतील. कुटुंबातील लहानसहान समस्येवर लक्ष घालणं टाळावं. जास्तीत जास्त लोकाभिमुख रहा. अनपेक्षित यश भेटेल.
वृश्चिक - शरीरातील सांधेदुखीवर लक्ष द्या. शारीरिक धावपळ टाळा. ध्यान केल्याने भरपूर त्रास कमी होईल. प्राण्यांमध्ये वेळ घालवा.
धनू - उडीदाचे पदार्थ दान करावेत, पितृदोष नाहीसा होतो. मारुतीची उपासना करावी. गुलाबी रंगछटेतील कपडे परिधान करा. म्हणजे शुभवार्ता भेटेल.
मकर - उसणे घेतलेले पैसे परत करा,आशिर्वाद भेटेल. शंकराची उपासना करावी. वाहन काळजीपूर्वक चालवा किंवा काही साहसी क्रीडा खेळणं टाळावं.
कुंभ - पैशांची चिंता मिटेल. कुठे पैसे किंवा संपत्ती विषयक काही प्रकरण मार्गी लागेल. दत्तात्रेयांची उपासना करावी. पिवळे गोड पदार्थ दान करावेत.
मीन - क्षुल्लक आरोग्याच्या समस्या जाणवतील. त्यामुळे सकाळी लवकरच औषधं घ्यावीत आणि दिवस निरोगी घालवावा. गुदगुल्या होणाऱ्या घटना घडतील. "अनियमित पणे देह संपत्ती नासे" ही म्हण लक्षात ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.