ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवाळी या सणाला अवघ्या काही दिवसात सुरूवात होणार आहे. दिवाळीला घरोघरी सजावट, दिव्यांची आरास, लायटिंग, कंदील लावतात.
दिवाळी हा सण अंधार दूर करून प्रकाशावर विजय मिळवणारा सण आहे. यानिमित्त तुम्ही देखील दिवाळीला घराला लायटिंग करत असाल तर वास्तुशास्त्राचे नियम माहित असायला हवेत.
वास्तुशास्त्रानुसार, दिवाळीला मुख्य दरवाजा सजवणे शुभ मानले जाते. घराच्या किंवा ऑफिसच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ तुम्ही दिवे, रांगोळी काढा.
घराच्या ईशान्य बाजूला तुम्ही सजावट करू शकता. दिवाळीनिमित्त तुम्ही लायटिंगने रोषणाई केल्याने अधिक आकर्षक दिसेल.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अंधार ठेवू नका. अंधार असल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. यामुळे दिवाळी प्रत्येक कोनाकोपऱ्यात दिवे लावा ज्याने नकारात्मकता दूर होईल.
दिवाळीनिमित्त घराच्या अंगणात, बाल्कनीत तसेच टेरेसवर तुम्ही लायटिंगची सजावट करा. यासाठी सौम्य आणि मंद लायटिंगची निवड करा.
दिवाळीला रंगाना विशेष महत्व आहे. यासाठी तुम्ही लायटिंग सजावटीसाठी योग्य रंग निवडा ज्यामुळे शांत आणि प्रसन्न वाटेल. घराच्या अंगणात लाल आणि निळ्या रंगाच्या लाईट्स वापरा ज्यामुळे घरात समृद्ध वाटेल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.