Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारची माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहिना प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.
जुलै २०२४ मध्ये सुरू झालेली लाडकी बहीण योजना अद्यापही सुरूच आहे. मात्र या योजनेत काही अपडेट आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता E-KYC करणे अनिवार्य केले आहे. यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते जाणून घ्या
E-KYC करण्यासाठी महिलांना अधिकृत वेबसाईटवर आधार क्रमांक, ओटीपी आणि कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. लाभार्थी महिलांना E-KYC करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे.
ऑनलाईन E-KYC करण्यासाठी आधार क्रमांक, नवीन फोटो, रेशनकार्ड, जन्म दाखला, मतदार ओळखपत्र, उत्पनाचा दाखला, विवाह प्रमाणपत्र, आधार कार्ड लिंक बँक खाते हे कागदपत्रे आवश्यक आहेत.